मुंबई : (Eknath Shinde) गेल्या तीन ते चार दिवसांपासून चर्चेत असलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी गुरुवारी, आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना पक्षातर्फे विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली.
विधानपरिषदेसाठी शिवसेनेच्या वाट्याला ९ पैकी २ जागा आल्या असून त्या जागेवर नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पक्षप्रवेशावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, "प्रहार संघटना पुढेही स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून कार्यरत राहणार असली तरी राजकीय लढा शिवसेनेच्या माध्यमातून उभारला जाईल. शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी, दलित, शोषित आणि गोरगरीबांच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी हा निर्णय घेतला असून पुढील वाटचाल पूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच असेल."(Eknath Shinde)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)म्हणाले की, "बच्चू कडू यांची ओळख ही आंदोलनातून उभी राहिलेली आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी काढलेले मोर्चे, दिव्यांगांसाठी उभारलेले आंदोलन, तसेच गोरगरीब, शोषित आणि पीडित घटकांसाठी सातत्याने रस्त्यावर उतरून लढा देत त्यांनी स्वतःची वेगळी छाप निर्माण केली."(Eknath Shinde)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....