Maharashtra Bans Misleading School Names : शाळांना इंटरनॅशनल, ग्लोबल नाव वापरण्यास प्रतिबंध; दिशाभूल करणाऱ्या शब्दांवर बंदी

    03-Apr-2026   
Total Views |
Maharashtra Bans Misleading School Names
 
मुंबई : (Maharashtra Bans Misleading School Names) राज्यातील स्वयंअर्थसहाय्यित शाळा अधिनियमाअंतर्गत नोंदणीकृत न्यास, नोंदणीकृत कंपनी किंवा नोंदणीकृत संस्थेद्वारे चालवण्यात येणाऱ्या खासगी शाळेच्या नावात इंटरनॅशनल, ग्लोबल असे दिशाभूल शब्द वापरण्यास राज्य सरकारने प्रतिबंध घातला आहे. गुरुवारी शालेय शिक्षण विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.(Maharashtra Bans Misleading School Names)
 
अनेक खासगी शाळांच्या नावांमध्ये 'इंटरनॅशनल' हा शब्द असल्याने संबंधित शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे, असा गैरसमज होतो. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये अभ्यासक्रम, शिक्षणाची गुणवत्ता, शुल्क आकारणी या मुद्यांवर दिशाभूल केली जाते. त्यामुळे अशा प्रकारे शाळेच्या नावात दिशाभूल करणारे शब्द वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.(Maharashtra Bans Misleading School Names)
 
यानुसार, आय. बी. केंब्रिज किंवा आय. जी. सी. एस. ई. इत्यादी आंतरराष्ट्रीय मंडळांशी संलग्न असलेल्या किंवा त्यांच्याशी संलग्न होण्यास इच्छूक असलेल्या शाळांनाच केवळ शाळेच्या नावात इंटरनॅशनल, ग्लोबल, युनिव्हर्सल, वर्ल्ड, युरो यासारख्या शब्दांचा वापर करता येईल. राज्यमंडळ, सी.बी.एस.ई. तसेच अन्य आंतरदेशीय मंडळांशी संलग्न असलेल्या शैक्षणिक संस्थांना शाळेच्या नावात इंटरनॅशनल, ग्लोबल, युनिव्हर्सल, वर्ल्ड, युरो या शब्दांचा वापर करण्यावर बंदी असेल.(Maharashtra Bans Misleading School Names)
 
ख्रिश्चन शाळांनाच 'कॉन्वेंट' शब्द वापरता येणार
 
यासोबतच ख्रिश्चन नन्स (भिक्षुणी) संचलित शाळांनाच कॉन्वेंट स्कुल समजण्यात येत असल्याने केवळ ख्रिस्ती धर्मसंघाद्वारे किंवा ख्रिश्चन नन्स (भिक्षुणी) समुदायाद्वारे संचलित शाळांनाच कॉन्वेंट शब्दाचा वापर करता येईल. इतर शाळांना हा शब्द वापरण्यास बंदी असेल. तसेच सैनिकी शाळा म्हणून मान्यताप्राप्त शाळांनाच शाळेच्या नावात सैनिकी शब्दाचा वापर करता येणार आहे. हा शासन निर्णय भुतलक्षी प्रभावाने लागू राहणार नाही.(Maharashtra Bans Misleading School Names)
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....