Anjali Damania : रुपाली चाकणकरांचे खरातला १७७ कॉल्स; अंजली दमानिया यांचा दावा

    03-Apr-2026
Total Views |
Anjali Damania
 
मुंबई : (Anjali Damania) रुपाली चाकणकर यांचे अशोक खरातला एकूण १७७ कॉल झाले असून सर्वाधिक कॉल असलेल्यांमध्ये त्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
 
अंजली दमानिया (Anjali Damania) म्हणाल्या की, "अशोक खरातची सीडीआर कॉपी माझ्याकडे आली आहे. रुपाली चाकणकर म्हणायच्या खरात माझे गुरू आहेत. पण त्यांचे एकूण १७७ कॉल्स अशोक खरात यांना झाले. त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांचे २३६ कॉल्स झाले आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे १७ नॉर्मल कॉल्स अशोक खरातला झाले. यामध्ये १० इनकमींग, ७ आऊट गोईंग होते. यात साधारण २१ मिनिटे अशोक खरात आणि एकनाथ शिंदे यांच्यात संभाषण झाले. तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ८, सुनील तटकरे यांचेही ८ कॉल आणि मंत्री आशिष शेलार यांचाही एक कॉल अशोक खरातला आहे."(Anjali Damania)
 
हेही वाचा : Ashish Shelar : नागरिक सुविधा शिबिरास मंत्री आशिष शेलार यांची भेट 
 
"अशोक खरातसोबत सगळ्यात जास्त वेळ कोण बोलले याची माहिती घेतली असता यामध्ये तृप्ती खरात यांचे पहिले नाव आहे. दुसऱ्या नंबरवर रूपाली चाकणकर आहे. ३३ हजार ७२७ सेकंद त्या अशोक खरातशी बोलल्या होत्या. त्यामुळे आताच्या घटकेला यांना अटक होऊन पूर्ण चौकशी झाली पाहिजे. कारण इतका वेळ कुणीही कुठल्याही गुरूंशी बोलत नाही. दिपक लोंढे हे तिसरे नाव आहे. ते दिपक केसरकर यांच्या जवळचे व्यक्ती आहेत. दिपक लोंढे यांचे १८९ कॉल्स झाले होते. देशातील सगळ्याच राज्यांमधून खरातला कॉल येत होते. यासोबतच कतार, युएस, व्हर्जीन आयलंड, ओमास, क्रिसमस आयलंड अशा देशांतूनही अशोक खरातला फोन येत होते. ही सगळी माहिती मी एसआयटीकडे दिली असून यावर पूर्ण चौकशी झाली पाहिजे," असेही अंजली दमानिया (Anjali Damania) म्हणाल्या.