रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक मकरंद (दादा) लेले यांचे निधन

    03-Apr-2026   
Total Views |

पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक आणि माजी पुणे महानगर कार्यवाह मकरंद तथा दादा लेले (वय ७७) यांचे गुरुवारी, दि. २ एप्रिल रोजी निधन झाले. दादा लेले यांनी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत (एनसीएल) दीर्घकाळ सेवा बजावली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. नोकरी आणि व्यवसाय सांभाळून त्यांनी संघाच्या कामात स्वतःला झोकून दिले होते.

गेल्या अनेक दशकांपासून ते संघ कार्यात सक्रिय होते. पुणे महानगर कार्यवाह म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. कार्यकर्त्यांची मोठी फळी निर्माण करण्यासोबतच विविध सामाजिक प्रकल्पांच्या उभारणीत त्यांचा मोलाचा सहभाग होता. शनिवार पेठ परिसरात त्यांचा निवास होता.

शुक्रवारी सकाळी ८ ते १० या वेळेत त्यांचे पार्थिव शनिवार पेठेतील गोवर्धन कार्यालय येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर सकाळी १०.३० वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दादा लेले यांच्या पश्चात पत्नी विनिता, मुलगी मेधा पुरकर, मुलगा मंदार, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक