CM Devendra Fadnavis : सफाई कामगारांच्या घरांना चालना; बोधगयात महाराष्ट्र भवन निश्चित
03-Apr-2026
Total Views |
मुंबई : (CM Devendra Fadnavis) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सफाई कामगारांच्या मालकी हक्काच्या घरांसंदर्भातील शासन निर्णयाला मान्यता दिल्याबद्दल तसेच बिहारमधील बोधगया येथे महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा केल्याबद्दल माजी मंत्री विजयभाई गिरकर यांनी स्वागत केले.(CM Devendra Fadnavis)
२० मार्च २०२६ रोजी चवदार तळे येथे आयोजित अभिवादन सभेत ही घोषणा करण्यात आली होती. या निर्णयामुळे सफाई कामगारांच्या दीर्घकालीन प्रलंबित घरांच्या प्रश्नाला चालना मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच बोधगया येथे महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असल्याने बौद्ध भिक्षू संघ व अनुयायांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.(CM Devendra Fadnavis)
या संदर्भात गिरकर यांनी भेट घेऊन समाधान व्यक्त केले. यावेळी संत रोहिदास समाज पंचायत संघ, मुंबईचे अध्यक्ष मयूर देवळेकर उपस्थित होते.(CM Devendra Fadnavis)