मुंबई : (South Mumbai LIC Buildings Redevelopment) दक्षिण मुंबईतील जीर्ण झालेल्या आणि मोडकळीला आलेल्या एलआयसी इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग लवकरच मोकळा होणार आहे. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली असून त्यांनी यासंदर्भात सकारात्मक मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.(South Mumbai LIC Buildings Redevelopment)
मंत्री लोढा यावर सातत्याने आवाज उठवत असून एलआयसी टेनंट्स अँड ऑक्युपंट्स वेल्फेअर असोसिएशनच्या मागणीचे पत्र घेऊन त्यांनी गुरुवारी नवी दिल्ली येथे निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. दक्षिण मुंबईतील विविध भागात एलआयसी आणि देना बँकेच्या अनेक जुन्या जीर्ण झालेल्या इमारती आहेत. या इमारतीतील शेकडो भाडेकरू जीव मुठीत घेऊन राहत आहेत. त्यातल्या अनेक इमारती सुमारे ९० वर्ष जुन्या आहेत. म्हाडाच्या नोटिसनंतर काही भाडेकरूनी इमारती रिकाम्या केल्या आहेत.(South Mumbai LIC Buildings Redevelopment)
गेली चार वर्ष सातत्याने मंत्री मंगलप्रभात लोढा हे या इमारतीतल्या रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. टेनंट्स संघटनेच्या निवेदनानुसार, या इमारतींच्या पुनर्विकास प्रक्रियेत मोठा विलंब होत असून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. एलआयसी अधिकाऱ्यांकडून ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सुमारे दोन वर्षे लागू शकतात, असे सांगण्यात आले आहे. पावसाळा जवळ येत असताना ही विलंबाची स्थिती भाडेकरूंमध्ये भीती आणि असुरक्षितता निर्माण करत आहे, असे मंत्री लोढा यांनी अर्थमंत्र्यांना सांगितले. या सर्व मुद्द्यांचा विचार करून पुढील तीन महिन्यात सकारात्मक मार्ग काढणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.(South Mumbai LIC Buildings Redevelopment)
संघटनेने यासंदर्भात काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. यात प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करणे, म्हाडाच्या निकषांनुसार भाडेकरूंना अंतरिम पर्यायी निवास उपलब्ध करून देणे, पुनर्विकासासाठी अनुभवी विकासकांची निवड करताना भाडेकरूंचा सहभाग सुनिश्चित करणे, रिक्त करण्यात आलेल्या इमारतीचे भाडे तात्पुरते स्थगित करणे आणि भाडेकरूंवर कोणतीही अतिरिक्त आर्थिक किंवा कायदेशीर जबाबदारी टाकू नये, यांचा समावेश निवेदनात करण्यात आला आहे.(South Mumbai LIC Buildings Redevelopment)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....