Mumbai Central Hanuman Temple : मुंबई सेंट्रल हनुमान मंदिर वादाला अखेर पूर्णविराम!

हमाल-कुली युनियनच्या ठाम भूमिकेला यश; नवीन मंदिर पूर्ण होईपर्यंत जुने मंदिर अबाधित राहणार

    03-Apr-2026   
Total Views |
Mumbai Central Hanuman Temple
 
मुंबई : (Mumbai Central Hanuman Temple) मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील हनुमान मंदिराच्या (Mumbai Central Hanuman Temple) संदर्भात दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागण्यांना अखेर सकारात्मक प्रतिसाद मिळाला. बजरंग दल कोकण प्रांत सहसंयोजक गौतम रावरिया आणि मुंबई सेंट्रल हमाल कुली युनियन यांनी मांडलेल्या मागण्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) यांनी मान्य केल्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या जागेवर १९६४ साली उभारण्यात आलेल्या हनुमान मंदिरा पाडून तिथे पार्किंगची व्यवस्था उभारण्याचा आदेश डीआरएम यांनी दिला होता. याबाबत हमाल कुली युनियनला कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. (Mumbai Central Hanuman Temple)
 
हमाल संघटनेच्या म्हणण्यानुसार, मंदिराच्या जागेवर पार्किंगची व्यवस्था केली जाणार असल्याने पश्चिम रेल्वे डीआरएम पंकज सिंह यांनी मंदिर हटवण्याबाबत आदेश दिला होता. त्यांनी सुरुवातीला मंदिर मूळ जागेवरून हटवून दुसऱ्या ठिकाणी बांधण्याबाबत स्पष्टता देखील दिली होती. त्यानुसार हमाल बांधवांनी नवीन १६ बाय १६ फूटाच्या जागेत मंदिर बांधण्याच्या प्रस्तावास मान्यताही दिली. आता डीआरएम यांनी नवीन आदेश देत, १६ बाय १६ फूट ऐवजी नवीन मंदिर १० बाय १० फूटांच्याच जागेत होईल असे सांगितल्याने मोठी खळबळ उडाली होती. (Mumbai Central Hanuman Temple)
 
त्यानंतर मुंबई सेंट्रल हमाल कुली युनियन यांच्याकडून डीआरएम यांना एक निवेदनपत्र देण्यात आले आणि मंदिराच्या पुनर्बांधणीसंदर्भात विविध मागण्या करण्यात आल्या. मंदिराच्या पुनर्बांधणी संदर्भात युनियनने १६x१६ फूट जागा देण्याची मागणी केली होती. सध्याचे मंदिर सुमारे ३२६ चौ.फुटांचे असले, तरी प्रस्तावित २५६ चौ.फुट जागा स्वीकारण्याची तयारी दर्शवण्यात आली होती; मात्र १६x१६ पेक्षा कमी जागा मान्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. डीआरएम यांनी ही मागणी मान्य करत मंदिरासाठी १६x१६ फूट जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, नवीन मंदिर पूर्णत्वास येईपर्यंत जुने मंदिर पाडण्यात येणार नाही, याबाबतही प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. नव्या ठिकाणी मंदिराची पूर्ण प्राणप्रतिष्ठा करूनच स्थलांतर करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अशा माहिती गौतम रावरीया यांनी दिली. (Mumbai Central Hanuman Temple) 
 
या निर्णयामुळे स्थानिक नागरिक, हमाल-कुली बांधव आणि हिंदू समाजामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, श्रद्धास्थानाचे जतन होणार असल्याने सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे. (Mumbai Central Hanuman Temple)
 
मंदिरांविषयी निर्णय घेताना खबरदारी राखली पाहिजे
 
हिंदुत्ववादी संघटना, मंत्री मंगलप्रभात लोढा आणि डीआरएम पंकज सिंग यांच्या सहकार्याने मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक येथील मंदिराचा विषय सहमतीने सुटला आहे. रेल्वे प्रशासन मंदिराला साजेशी अशी जागा देणार असल्याने सर्वांचे मनःपूर्वक आभार. मंदिर हा खूप मोठ्या हिंदू समाजाच्या आस्थेचा विषय असून याबाबतीत काहीही निर्णय घेताना खबरदारी राखली पाहिजे हे ह्या निमित्ताने सांगता येईल. (Mumbai Central Hanuman Temple)
- संदीप घुगे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य रेल्वे हमाल कामगार युनियन
 
मंदिरात सण-उत्सव उत्साहाने साजरा होतात
 
अवघ्या ४५ x १२ फुटांच्या या मंदिरात राधा-कृष्ण, हनुमानजी, लक्ष्मी माता, गणेश, भगवान शंकरांची पिंडी, तसेच नंदी आणि कासव अशा विविध देवतांच्या मूर्ती आहेत. येथील हमालांच्या या कुटुंबाने केवळ श्रमच नाही, तर संस्कृतीचीही अखंड परंपरा जपली आहे. वर्षानुवर्षे ते येथे प्रत्येक सण या मंदिरात उत्साहाने साजरा करतात. अखंड हरिनाम सप्ताह असो, गणेशोत्सवाची धामधूम असो, नवरात्रीची भक्तीमय रात्र असो किंवा श्रावण महिन्यातील सत्यनारायण पूजा प्रत्येक सोहळा या मंदिरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करतो. (Mumbai Central Hanuman Temple)
  

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक