Malda Violence : मालदा हिंसाचाराच्या मास्टरमाइंडला अटक! पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या Mofakkerul Islamच्या विमानतळावरच आवळल्या मुसक्या

    03-Apr-2026   
Total Views |

Malda Violence

मुंबई : (Malda Violence) पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यातील कालियाचक येथे झालेल्या तणावाचा आणि न्यायालयीन अधिकाऱ्यांना ओलीस ठेवण्याच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोफक्‍करुल इस्लाम याला पश्चिम बंगाल पोलिसांनी शुक्रवारी सकाळी दि. ३ एप्रिल रोजी अटक केली आहे. राज्यातून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला बागडोगरा विमानतळावर गाठले. (Malda Violence)

तपास यंत्रणांच्या मते, सात अधिकाऱ्यांना ओलीस ठेवण्याच्या आणि कालियाचकमधील जमावाला भडकवण्याच्या संपूर्ण कटामागे मोफक्करूल इस्लाम हाच सूत्रधार होता. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत १७ जणांना अटक केली असून, त्यात आयएसएफ उमेदवार मौलाना शाहजहान अली यांचाही समावेश आहे, ज्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. (Malda Violence)

शाहजहान अली स्वतःला निर्दोष असल्याचा दावा करत असला तरी, पोलिसांकडे भक्कम तांत्रिक पुरावे असल्याचा दावा आहे. ही अटक महत्त्वपूर्ण आहे कारण राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) लवकरच मालदा येथे दाखल होणार असून या प्रकरणाचा तपास हाती घेणार आहे. कटातील सूत्रधारांच्या चौकशीतून या कटाचे अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे. (Malda Violence)

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\