Indian Oil : देशभरात एलपीजीचा पुरवठा सुरळीत

तुटवडा नसल्याचे इंडियन ऑइलचे स्पष्टीकरण

Total Views |

 
Indian Oil

 

नवी दिल्ली : (Indian Oil) जागतिक स्तरावरील भू-राजकीय घडामोडींमुळे ऊर्जा बाजारपेठांवर परिणाम होत असला, तरी देशातील एलपीजीचा पुरवठा स्थिर, पुरेसा आणि नियंत्रणाखाली असल्याची माहिती इंडियन ऑइलने (Indian Oil) दिली आहे. घरगुती एलपीजी पुरवठ्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून नागरिकांना कोणतीही अडचण भासणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.(Indian Oil)

इंडियन ऑइलकडून (Indian Oil) दररोज सुमारे २८ लाख एलपीजी सिलिंडर्सचे वितरण केले जात असून, हे प्रमाण पूर्वीप्रमाणेच नियमित आहे. त्यामुळे देशात एलपीजीचा कोणताही तुटवडा नसल्याचे कंपनीने सांगितले आहे. ग्राहकांनी एलपीजी बुकिंगसाठी एसएमएस आणि आयव्हीआरएससारख्या डिजिटल माध्यमांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या जवळपास ८७ टक्के बुकिंग डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे होत आहेत. तसेच, सिलिंडर योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड प्रणालीचा वापर केला जात आहे.(Indian Oil)

 हेही वाचा : Malda Violence : मालदा हिंसाचाराच्या मास्टरमाइंडला अटक! पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या Mofakkerul Islamच्या विमानतळावरच आवळल्या मुसक्या 

 

काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी विशेष पथके

काही वितरकांकडून गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारींची दखल घेत इंडियन ऑइलने (Indian Oil) कठोर कारवाई सुरू केली आहे. काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी विशेष पथके नेमण्यात आली असून आतापर्यंत ७,५०० हून अधिक तपासण्या करण्यात आल्या आहेत. यात १४१ वितरकांवर कारवाई करण्यात आली असून, ५ वितरकांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. याशिवाय, राज्य सरकारांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर धाडी टाकण्यात आल्या आहेत. आतापर्यंत ६८,००० धाडी, ८५५ एफआयआर आणि ४८,००० हून अधिक सिलिंडर्स जप्त करण्यात आले आहेत.(Indian Oil)

अनावश्यक साठा करू नये

इंडियन ऑइलने (Indian Oil) ग्राहकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, एलपीजीसाठी रांगा लावू नयेत किंवा अनावश्यक साठा करू नये. अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असेही सांगण्यात आले आहे. एलपीजीचा पुरवठा सुरळीत ठेवणे, वितरणात पारदर्शकता राखणे आणि गैरप्रकारांवर कठोर कारवाई करणे यासाठी इंडियन ऑइल पूर्णपणे कटिबद्ध असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.(Indian Oil)

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.