मुंबई : (LPG rumours) एलपीजी आणि पेट्रोल-डिझेलच्या तुटवड्याबाबत पसरणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे लोकांमध्ये भीती निर्माण होत आहे. याच पार्श्वभूमीवर पेट्रोलियम सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून साठेबाजी आणि काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.(LPG rumours)
एलपीजी आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांची, साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी आवश्यक कारवाई करावी, असे निर्देश पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाचे सचिव, डॉक्टर नीरज मित्तल यांनी पत्राद्वारे दिले आहेत. काही भागांमध्ये अफवा आणि चुकीच्या माहितीमुळे, अनावश्यक चिंता आणि भीतीमुळे, गरज नसताना लोक गॅस सिलिंडर खरेदी करत आहेत, याकडे लक्ष वेधले.(LPG rumours)
सध्या केवळ १७ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशच, प्रसारमाध्यमांना, नियमित किंवा वेळोवेळी माहिती देत आहेत. साठेबाजी, अफरातफरी आणि भीती निर्माण करणाऱ्या चुकीच्या माहितीच्या प्रसारावर, काटेकोर देखरेख ठेवण्याचा राज्यांना सल्ला देण्यात आला आहे.(LPG rumours)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\