नागपूर : (Chandrashekhar Bawankule) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी करण्यात येत असताना काँग्रेसने उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. मात्र, ही निवडणूक बिनविरोध करावी, अशी मागणी महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "अजित पवार यांचा सर्वांसोबत आत्मियतेचा सहवास राहिला. बारामतीची जागा त्यांची आहे. काँग्रेसलाही अनेक वर्षे अजितदादांचा सहवास मिळाला. त्यांच्या आयुष्यातील ७५ टक्के राजकारण काँग्रेस नेत्यांच्या सहवासात गेले. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध करावी. राहुरीमध्ये लढल्यास अडचण नाही. परंतू, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार लढत असून सर्वांनी ही निवडणूक बिनविरोध करावी. अजितदादांच्या आठवणी आयुष्यभर आपल्या मनात राहणार आहेत. त्यामुळे काँग्रेसने किमान या निवडणूकीत आपला मोठेपणा दाखवावा," असे ते म्हणाले. तसेच राष्ट्रवादीच्या विलीनीकरण्याबाबत सुनेत्रा पवार निर्णय करतील, असेही त्यांनी सांगितले.(Chandrashekhar Bawankule)
धन दांडग्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ नये
"अवकाळी पावसाबाबत सध्या असलेल्या जीआरनुसार, एनडीआरएफच्या नियमांनुसार, सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. एखाद्या शेतकऱ्याने फार्म हाऊससाठी कर्ज उचलणे, मर्सिडीज घेणे, शेतात मोठे घर बांधणे यासाठी कर्ज घेतले असल्यास असल्यास अशा धन दांडग्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ नये. पीक कर्ज माफ व्हावे, यासाठी शासन काम करत आहेत."(Chandrashekhar Bawankule)
सुषमा अंधारे यांच्या वक्तव्यावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "जादु टोण्याने माणसाचा अपघात होतो का? कुणावरही फुली मारून लोक मरायला लागले तर मग खरात ठरवेल तो मरेल. या भोंदुगिरीला आणि जादूटोण्याला अर्थ नाही. जादूटोणा, भोंदुगिरी पाप आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांच्या म्हटले तरी, फुली मारून अपघात होत नाही."(Chandrashekhar Bawankule)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....