डोंबिवली : (Unimax World project) युनिमॅक्स वर्ल्डने आपल्या नव्या निवासी प्रोजेक्ट ‘ऑक्सीलक्स लिव्हिंग’ ची मंगळवारी घोषणा केली असून त्यांचे अनावरण करण्यात आले आहे. शहराच्या पूर्व भागात वेगाने विकसित होत असलेल्या लक्झरी हाऊसिंग सेगमेंटमध्ये एक महत्त्वाची भर टाक णारे ठरणार आहे.
डोंबिवली पूव्रेतील हा प्रकल्प आधुनिक घर खरेदीदारांच्या उच्च जीवनशैलीच्या अपेक्षा लक्षात घेऊन त्याची रचना करण्यात आली आहे. या प्रकल्पात प्रशस्त घरे, आधुनिक आर्किटेक्चर आणि जागतिक दर्जाच्या सुविधा यांचा उत्कृष्ट संगम आहे. ज्यामुळे दैनंदिन जीवन अधिक आरामदायी आणि समृध्द होईल.
सुमारे तीन एकर परिसरात विकसित करण्यात आलेला हा गेटेड टाऊनशिप प्रकल्प चार भव्य टॉवर्ससह आहे. एमएमआर मधील वेगाने विकसित होणा:या भागांपैकी एक असलेल्या डोंबिवली पूर्वमध्ये रणनीतीदृष्टया स्थित असलेला हा प्रकल्प सुधारत चाललेल्या इन्फ्रास्ट्रक्चरचा फायदा घेतो. मेट्रो लाईन 12, प्रस्तावित ऐरोली-काटई नाका फ्री वे आणि प्रमुख रस्त्यांच्या जवळ असल्यामुळे येथे उत्कृष्ट कनेक्टिव्हिीटी मिळते. तसेच शांत निवासी वातावरण ही टिकून राहते, असे प्रकल्पाचे स्टेक होल्डर्स यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेला युनिमॅक्स वर्ल्ड (Unimax World project)संस्थापक आणि व्यवस्थपकीय संचालक मोहम्मद इसराइल शेख, डायरेक्टर सलीम देसाई आदी उपस्थित होते. (Unimax World project)
मोहम्मद इसराइल शेख म्हणाले, ऑक्सीलक्स लिव्हिंग हा आमच्या उच्च दर्जाच्या निवासी स्पेस विकसित करण्याच्या वचनबध्दतेचा पुरावा आहे. आराम, सुविधा आणि आधुनिक डिझाइन यांचा उत्तम समतोल साधत हा प्रोजेक्ट शहरी ग्राहकांच्या बदलत्या गरजांना अनुरूप आहे. या प्रकल्पात 50 हून अधिक सुविधा देण्यात आल्या आहेत. (Unimax World project)
सलीम देसाई म्हणाले, हा प्रोजेक्ट भविष्यातील गरजा लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आला आहे. मजबूत इन्फ्रास्ट्रक्चर, विचारपूर्वक नियोजन आणि जीवनशैलीशी संबंधित सुविधा यामुळे घर खरेदीदारांना उत्कृष्ट अनुभव आणि दीर्घकालीन मूल्य मिळेल असे सांगितले. (Unimax World project)