Pratap Sarnaik's Marathi Mandate : रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत

मंत्री प्रताप सरनाईक; मराठी भाषेसाठी परवाना रद्द होणार नाही

    29-Apr-2026   
Total Views |

Pratap Sarnaik
 
मुंबई : ( Pratap Sarnaik's Marathi Mandate) राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली असून दि. १ मे ते १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकवण्याची मोहिम राबवण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
 
मंगळवारी मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत सगळ्या प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की(Pratap Sarnaik's Marathi Mandate), "राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन विभागाने १ मे ते १५ ऑगस्टदरम्यान विशेष पडताळणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेचे नेतृत्व अतिरिक्त परिवहन आयुक्त रवींद्र गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या ४ सदस्यीय समितीकडे सोपविण्यात आले आहे."(Pratap Sarnaik's Marathi Mandate)
 
...तर परवाना रद्द करणार
 
"राज्यातील सर्व ५९ आरटीओंना १ मेपासून विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले असून, या अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या चालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे. केवळ मराठी भाषा येत नाही या कारणावरून परवाना रद्द केला जाणार नसून, इतर कायदेशीर तरतुदींनुसारच कारवाई केली जाईल."(Pratap Sarnaik's Marathi Mandate)
 
महाराष्ट्रात व्यवसाय करण्यासाठी मराठी शिकावेच लागेल
 
"ज्या चालकांना मराठी शिकण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये जागा उपलब्ध करून दिली जाईल. त्यांना शिकवण्यासाठी पुस्तिका दिल्या जातील. 'कोकण मराठी साहित्य परिषद' आणि 'मुंबई मराठी साहित्य संघ' या संस्थांच्या माध्यमातून आमचे आरटीओ अधिकारी त्यांना मराठीचे धडे देतील. दि. १ मे ते १५ ऑगस्टदरम्यान, त्यांनी मराठी शिकायला हवे. मराठी शिकण्यासाठी आम्ही वेळ द्यायला तयार आहोत. कुणी कितीही दबाव टाकला, आंदोलन करू असे म्हटले तरी महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असल्यास मराठी शिकावे लागेल. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठीचे पुस्तक देण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या व्हॉट्सअॅपवर ई-पुस्तिका पुरवण्यात येईल. १०० दिवसांच्या मोहिमेत ज्यांना आम्ही परवाने दिले ते मराठी बोलतील," असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यासोबतच ओला, उबर, रॅपिडो यांच्या चालकांनाही मराठी भाषा शिकणे अनिवार्य करण्याची तरतूद असून त्यांना याविषयीच्या सूचना देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.(Pratap Sarnaik's Marathi Mandate)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....