Maharashtra Legislative Council election BJP list : विधानपरिषदेसाठी भाजप उमेदवारांची यादी जाहीर

    29-Apr-2026   
Total Views |
legislative-council-election-bjp-candidate-list
 
मुंबई : (Maharashtra Legislative Council election BJP list) भाजपने गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली विधानपरिषद निवडणुकीसाठीची आपली उमेदवार यादी मंगळवारी जाहीर केली. अनेक नावे चर्चेत असताना भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा वापर करत वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावंतांना संधी दिली आहे.
 
विधानपरिषदेच्या ९ जागांपैकी ५ जागा भाजपच्या वाट्याला आल्या असून या पाचही उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यात सुनिल कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांच्या नावांचा समावेश आहे.(Maharashtra Legislative Council election BJP list)
 
यापैकी सुनील कर्जतकर हे भाजपचे ज्येष्ठ आणि संघटनात्मक कामात सक्रीय नेते असून यावेळी त्यांना त्यांच्या निष्ठेचे फळ मिळाले आहे. माधवी नाईक या भाजपच्या प्रमुख महिला नेत्या असून त्यांनी भाजप प्रदेश सरचिटणीस म्हणूनही काम केले आहे. संजय भेंडे हे भाजप प्रदेश उपाध्यक्ष आहेत. विशेषतः नागपूर विभागात ते अधिक सक्रिय आहेत. प्रमोद जठार हे कोकणातील भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत. तर, विवेक कोल्हे हे ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांचे नातू आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव आहेत.(Maharashtra Legislative Council election BJP list)
 
हेही वाचा :  SRA projects Mumbai : अतिक्रमणे वाढू देऊ नका; मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश
 
पोटनिवडणुकीसाठी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी
 
तसेच विधानपरिषद सदस्या असलेल्या प्रज्ञा सातव यांनी काँग्रेसच्या विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवरही पोटनिवडणूक होणार आहे. या जागेवर भाजपने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली आहे.(Maharashtra Legislative Council election BJP list)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....