डोंबिवली : (Growth Center TDR) कल्याण डोंबिवली महापालिकेत 27 गावे समाविष्ट झाल्यापासून महासभेत कोणता ना कोणता विषय पटलावर असतोच. 27 गावे यांची वेगळी नगरपालिका करा, पाण्याचा विषय, रस्ते, नालेसफाईचा विषयावर नेहमीच नगरसेवक आवाज उठवत असतात.यातच आता याच 27 गावातील ग्रोथ सेंटर टिडिआर विषय पुढे आला आहे. भाजप नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी ग्रोथ सेंटरचा टिडिआर महापालिका क्षेत्रात वापरण्यास बंदी घालावी अशी मागणी केली आहे.
(Growth Center TDR)
म्हात्रे यांनी सांगितले की, जेव्हा पासून ग्रोथ सेंटरचा (Growth Center TDR) टिडिआर कल्याण डोंबिवलीत वापरायला परवानगी दिली आणि त्याचा जीआर काढण्यात आला.त्यामुळे टिडिआर किंमत कमी झाली असून डोंबिवली मधील स्थानिकांना आणि भूमिपुत्र यांना त्याचा फटका पडत आहे.जर ग्रोथ सेंटर मधील टिडिआर कल्याण डोंबिवलीत महापालिका क्षेत्रात वापरायला बंदी घालावी किंवा ग्रोथ सेंटर मधील टिडिआर ग्रोथ सेंटर मध्येच वापरावा.
जेणेकरून टिडिआर किंमत वाढेल आणि लोक आपल्या जमिनी रिंगरूट, इतर प्रकल्पासाठी देतील आणि त्याच्यामुळे जमीन अधिग्रहण लवकर होईल.पण हे कोणाला कळत नाही.ह्याच्यामध्ये विशेष बिल्डर ऍक्टिव्हिटी करतात आणि त्याच्यामुळे टिडिआरची किंमत वाढावी याच्यासाठी जाणूनबुजून ग्रोथ सेंटरचा टिडिआर कल्याण डोंबिवलीत वापरायला परवानगी दिली गेली आहे.हा विषय मी स्टँडिंग कमिटीच्या बैठकीत मांडला होता आणि महासभेत पण मांडणार आहे.
या विषयाला आम्ही तीव्र विरोध करणार आहोत. तसेच ग्रोथ सेंटरचा टिडिआर कल्याण डोंबिवलीत वापरला गेला तर कोट्यावधीचे नुकसान भूमीपुत्रांचे होणार असून यामुळेच शेतकरी जमीन द्यायला तयार होत नाही, शासनाने याची दखल घ्यावी आणि सदर ठिकाणचा टिडिआर महापालिका क्षेत्रात वापरण्यास बंदी घालावी, अशी आमची मागणी आहे, असे म्हात्रे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रशासन आता याकडे कसे पाहते आणि यातून काय मार्ग निघतो हे पाहावे लागेल.(Growth Center TDR)
ग्रोथ सेंटरला संघर्ष समितीने केला होता विरोध
२७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीने तत्कालीन मुख्यमंत्री आणि आतचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देत कल्याण ग्रोथ सेंटर हे रद्द करण्याची मागणी केली होती.२७ गावातील १ हजार ८९ हेक्टर जागेवर कल्याण ग्रोथ सेंटर उभारले जाईल. त्यासाठी १ हजार ८९ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला होता. मात्र अद्याप ग्रोथ सेंटरची एकही वीट रचली गेली नाही.या ग्रोथ सेंटरमुळे गृह विकास प्रकल्पांना मंजूरी मिळत नाही.याकडे समितीने लक्ष वेधले होते.(Growth Center TDR)