मुंबई : (SRA projects Mumbai) झोपडपट्टी पुनर्वसन योजनातील अडथळे दूर करत यापुढे अतिक्रमण होऊ नये, असे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी अधिकाऱ्यांना दिले.
सोमवारी उपनगर जिल्ह्यातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमण आणि या जमिनींवरील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांची आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीत या सर्व प्रकल्पांची सद्यस्थिती, अडचणी यांचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, सर्व पुनर्वसन प्रकल्प पूर्ण झाल्यावर १ लाख ७५ हजार पात्र झोपडपट्टीधारकांना घर मिळणार आहे.(SRA projects Mumbai)
२०१६ च्या सर्वेक्षणानुसार, मुंबई उपनगर जिल्ह्यातील सुमारे ४ हजार १९४ एकर शासकीय जमिनीवर अतिक्रमण आहे. या जमिनी राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका, म्हाडा आणि केंद्र सरकारच्या मालकीच्या आहेत. शासकीय जमिनीवर असलेल्या या अतिक्रमणांच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा आढावा यावेळी घेण्यात आला. सद्यस्थितीत ८७.७९ लाख चौरस मीटरवर ९२६ पुनर्वसन प्रकल्प आहेत. यापैकी १६० प्रकल्प पूर्ण झालेले आहेत. ३२२ प्रकल्प सुरू असून ११४ स्थगित आहेत. तर ३३० प्रकल्पांची मंजुरी प्राप्त झाली आहे. या सर्व प्रकल्पांमधून सुमारे पात्र १ लाख ७५ हजार ५११ झोपडपट्टी धारकांना घर मिळणार आहे. याकरिता सुमारे १ लाख ४ हजार ८९२ Provisional PAP घरे सुमारे २३ हजार ९ घरे उपलब्ध होणार आहे. त्याकरिता २ हजार ४१६ कायमस्वरूपी ट्रांझिट कॅम्पचा समावेश आहे.(SRA projects Mumbai)
सुरू असलेले प्रकल्प तातडीने पूर्ण करावे. स्थगित प्रकल्पांबाबत आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी. पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर घरे उपलब्ध करून द्यावी. यापुढे अतिक्रमण रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. बेकायदेशीर अतिक्रमणांबाबत माहिती मिळावी यासाठी प्रधानमंत्री गतीशक्ति अभियांनाअंतर्गत 'नेत्रम' ही संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे. याद्वारे सॅटेलाईट छायाचित्रांच्या माध्यमातून अतिक्रमणांवर लक्ष ठेवण्यात येते. तसेच अतिक्रमण होत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांना त्याची माहिती दिली जाते. अतिक्रमण रोखण्यासाठी ही प्रणाली महत्त्वाची आहे. 'नेत्रम' द्वारे प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे अतिक्रमण दूर करण्याची कार्यवाही करावी याबाबत मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी निर्देश दिले.(SRA projects Mumbai)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....