Shivaji Kon Hota Book Controversy : 'शिवाजी कोण होता?' पुस्तकाच्या प्रकाशकांवर मोठी कारवाई

बुलढाण्यात आंदोलनस्थळी वातावरण तापलं

    28-Apr-2026
Total Views |

skh

मुंबई : (Shivaji Kon Hota Book Controversy) गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावरुन मागचे काही दिवस महाराष्ट्राचे राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करुन शिवीगाळ केल्याचे वृत्त समाजमाध्यमांवर चर्चेत आले होते. गेल्या काही दिवसांपासून या पुस्तकावरून सुरू असलेला वाद शमण्याची चिन्ह दिसत नाहीये. अशातच, प्रकाशक संजय आंबी यांना बुलढाण्यात स्थानबद्ध केले असल्याची माहिती पोलीसांनी दिली. त्याचबरोबर बुलढाण्यात आंदोलनस्थळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि पोलीसांमध्ये झटापट झाल्याची प्राथमिक माहिती माध्यमांना मिळाली आहे.
 
दि. २७ एप्रिल रोजी कोल्हापुरातील बिंदू चौकात सरकारच्या विरोधात काही पुरोगामी संघटनांनी आंदोलन केले होते. याप्रसंगी पोलीसांमध्ये आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट झाली. यावेळी 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाच्या प्रती दाखवत आंदोलनकर्त्यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या. अशातच दि. २८ एप्रिल रोजी बुलढाण्यात प्रशांत आंबी यांना स्थानबद्ध केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते ज्या स्थळी आंदोलन करत आहेत. तिथे तणावपूर्वक परिस्थीती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.