रत्नागिरी - चंपक मैदानावरुन नागाने घोणसला मारल्याची दुर्मीळ नोंद

    28-Apr-2026
Total Views |

ratnagiri champak maidan



मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
रत्नागिरीच्या चंपक मैदानावर नागाने घोणस सापाला मारल्याची दुर्मीळ नोंद झाली आहे (ratnagiri champak maidan). एका विषारी सापाने दुसऱ्या विषारी सापाला मारल्याची घटना तशी दुर्मीळ आहे (ratnagiri champak maidan). नाग इतर सापांना आपले भक्ष बनवत असला तरी, निसर्गतः तो मुद्दाम घोणस सापाला मारत नाही (ratnagiri champak maidan). अशा प्रकारच्या घटनांमागे बरीच कारणे असतात. (ratnagiri champak maidan)
 
 
रत्नागिरीचे पक्षी निरीक्षक अॅड. प्रसाद गोखले हे चंपक मैदानावर पक्षी निरीक्षणासाठी गेले असता, त्यांना नाग आणि घुरसे सापाची झटापट होताना दिसली. नागाने घोणसला मारले आणि त्याला खाण्यास देखील सुरुवात केली. मात्र, काही काळाने त्याने घोणसला पुन्हा बाहेर काढले. आता हे का झाले, तर भारतीय नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे हे चार साप भारतातील बिग फोर म्हणजेच सर्वात धोकादायक आणि अतिवाषारी साप आहेत. यामधील भारतीय नाग प्रामुख्याने उंदीर खातो. पण तो प्रसंगी इतर सापांनाही आपले भक्ष बनवतो. निसर्गतः नाग मुद्दाम घोणस सापाला मारण्यासाठी शोधत नसला तरी, नागाने घोणसला मारण्याची काही प्रमुख कारणे आहेत. यातील पहिले कारण म्हणजे हद्दक्षेत्र. नाग आणि घोणस हे दोन्ही उंदीर जास्त असलेल्या ठिकाणी जसे की शेत किंवा मानवी वस्त्या अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. एकाच ठिकाणी अन्नासाठी किंवा निवाऱ्यासाठी स्पर्धा निर्माण झाल्यास त्यांच्यात स्पर्धा होऊ शकते त्यात कोब्रा वरचढ ठरू शकतो.
 
 
चंपक मैदानावरील नाग-घोणसची झटापट ही अशीच हद्दीसाठी झाल्याची शक्यता आहे. कारण, त्या घटनेत नागिन घोणसला खाल्ले नाही. आता नाग हा घोणसवर वरचढ का ठरतो, तर त्याची शारीरिक वैशिष्ट्य आणि विषामुळे. नाग हा घोणसपेक्षा अधिक लांब आणि चपळ असतो. नाग त्याच्या शरीराचा एक तृतीयांश भाग हवेत उंचावू शकतो, ज्यामुळे त्याला घोणसवर वरून हल्ला करणे सोपे जाते. याशिवाय नागाचे विष प्रामुख्याने न्युरोटॉक्सिक असते, जे मज्जासंस्थेवर हल्ला करते आणि श्वसनक्रिया थांबवते. घोणसचे विष हेमोटॉक्सिक असते, जे रक्तावर आणि पेशींवर परिणाम करते. नागाचे न्युरोटॉक्सिक विष हे घोणसच्या शरीरात अधिक वेगाने पसरून त्याला लवकर निष्क्रिय करू शकते. नसर्गिक संघर्षात कोब्राच्या चपळाईमुळे आणि सापांची शिकार करण्याच्या त्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीमुळे त्याचे पारडे जड असते. मात्र, रसेल व्हायपरने जर आधी जीवघेणा चावा घेतला, तर नागचा देखील मृत्यू होऊ शकतो.