मुंबई : (Nashik Corporate Jihad Case) नाशिकच्या एका आयटी कंपनीत घडलेल्या कॉर्पोरेट जिहाद (Nashik Corporate Jihad Case) प्रकरणात नवा खुलासा समोर आलाय. सोमवारी नाशिक न्यायालयातील सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने या कटाचे धागेदोरे नाशिकच्या बाहेर मालेगाव आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मलेशियापर्यंत जोडलेले असल्याचे उघड केले. विशेष सरकारी वकील अजय मिश्रा यांनी न्यायालयाला सांगितले की, एसआयटीला असे ठोस पुरावे मिळाले आहेत, जे मुख्य आरोपी निदा खान आणि तिच्या सहकाऱ्यांच्या सखोल सहभागाकडे स्पष्टपणे निर्देश करतात. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आता फरार निदा खानच्या शोधात सक्रिय झाले आहेत.
सरकारी पक्षाने सांगितले की, निदा खानने कथितरित्या एका हिंदू तक्रारदार महिलेला इस्लाम स्वीकारण्यासाठी प्रवृत्त केले, तिला बुर्का परिधान करायला लावला आणि नमाज पढण्याचे प्रशिक्षण दिले. याशिवाय, हिंदू पीडितेच्या मोबाईलमध्ये काही अॅप्स डाउनलोड करून तिचे नाव बदलून ‘हानिया’ ठेवण्याची तयारी सुरू होती. (Nashik Corporate Jihad Case)
तपासात हेही समोर आले की, सहआरोपी दानिश शेखने हिंदू तक्रारदार महिलेची महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रे स्वतःकडे घेतली होती, जी मालेगावातील एका टीमकडे सुपूर्द केली जाणार होती. तसेच, इमरान नावाच्या व्यक्तीमार्फत तिला मलेशियाला पाठवण्याची योजनाही आखण्यात आली होती. मात्र, बचाव पक्षाच्या वकिलांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत हा धार्मिक भावनांशी संबंधित विषय असल्याचे म्हटले. सध्या न्यायालयाने निदा खानला कोणताही दिलासा दिलेला नाही असून पुढील सुनावणी २ मे रोजी होणार आहे. (Nashik Corporate Jihad Case)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक