Monsoon Preparation : ८ हजार अस्थापनांना नोटीस; ३३ हजार फांद्यांची छाटणीचे मोठे आव्हान

आर सेंट्रल आणि के साऊथ विभागात सर्वाधिक कारवाई

    28-Apr-2026
Total Views |
Mansoon Preparation BMC
 
मुंबई : (Monsoon Preparation) पावसाळा तोंडावर येत असताना धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी न करणाऱ्या खाजगी व शासकीय एकूण ७ हजार ९७८ अस्थापनांना बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये आर सेंट्रल आणि के साऊथ विभागात सर्वाधिक नोटिसा देण्यात आल्याचे समोर आले आहे.
 
मुंबईत रस्त्यालगत एकूण १ लाख ९० हजार २९६ झाडे असून, त्यापैकी ९२ हजार २७७ झाडांच्या फांद्यांची छाटणी आवश्यक असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. सध्या २६ हजार ६७२ झाडांची छाटणी पूर्ण करण्यात आली असून, उर्वरित ३३ हजार ४८ फांद्यांची छाटणी ३१ मेपूर्वी पूर्ण करणे हे उद्यान विभागासमोर मोठे आव्हान आहे. (Monsoon Preparation)
दरम्यान, शहरात आजघडीला १७ झाडे अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याचा अहवाल समोर आला आहे. (Monsoon Preparation)
 
पावसाळ्यापूर्वी प्रशासनाची धावपळ
 
पावसाळ्याला अवघे दीड महिना शिल्लक असताना पालिकेने नालेसफाईचे ८० टक्के उद्दिष्ट ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. त्याचबरोबर दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणारा धोकादायक झाडांचा प्रश्न टाळण्यासाठी यंदा आधीच फांद्यांच्या छाटणीवर भर देण्यात येत आहे. (Monsoon Preparation)
 
हेही वाचा :  Monsoon Preparation : महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभालीचे काम सकाळच्या सत्रात
 
रस्त्यालगतच्या ५९ हजार ७२० झाडांची छाटणी प्रक्रिया सुरू असून, काम वेगाने पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कार्यरत आहे.
 
नागरिकांना आवाहन
 
गृहनिर्माण संस्था, शासकीय-निमशासकीय कार्यालये आणि खासगी जागेवरील धोकादायक झाडांची छाटणी करण्यासाठी संबंधित विभागातील उद्यान अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे. (Monsoon Preparation)
 
या विभागांमध्ये सर्वाधिक नोटिसा
 
आर सेंट्रल – २३१७
के साऊथ – १४९५
भांडुप – ६६९
आर साऊथ – ४६०
आर नार्थ – ४३८
एफ नार्थ – ४२८
मुलुंड – ३४१
एम पूर्व – २५५