मुंबई : (Mira Road attack Case) मीरा रोड परिसरात एका ३१ वर्षीय धर्मांध मुस्लिमाने दोन सुरक्षा रक्षकांवर केवळ ते ‘कलमा’ म्हणू शकले नाहीत म्हणून चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीची ओळख जैब जुबैर अन्सारी अशी झाली असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आता महाराष्ट्र एटीएसनेही तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत, कारण प्राथमिक तपासात आरोपीच्या मोबाईल आणि इंटरनेट हिस्ट्रीमध्ये आयएसआयएसशी संबंधित व्हिडिओ आढळल्याची माहिती समोर आली.
मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण घटना रविवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली. मीरा रोड ईस्टमधील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर राजकुमार मिश्रा आणि सुब्रतो सेन नावाचे दोन सुरक्षा रक्षक ड्युटीवर तैनात होते. त्याचवेळी तेथे जैब जुबैर अन्सारी आला आणि त्याने सुरक्षा रक्षकांना त्यांचे नाव आणि धर्म विचारला. त्यांनी उत्तर दिल्यानंतर आरोपीने त्यांना ‘कलमा’ म्हणता येते का, असा प्रश्न विचारला. सुरक्षा रक्षकांनी नकार दिल्यावर आरोपी संतापला आणि त्याने चाकू काढून दोघांवर हल्ला केला. या हल्ल्यात राजकुमार मिश्रा गंभीर जखमी झाले आहेत. (Mira Road attack Case)
हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता, मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने त्याला नया नगर परिसरातील त्याच्या भाड्याच्या घरातून ताब्यात घेतले. आरोपी जैब अन्सारी हा सुशिक्षित असल्याचे समोर आले आहे. तो २०१९ पर्यंत अमेरिकेत शिक्षण घेत होता. भारतात परतल्यानंतर तो एका कोचिंग सेंटरमध्ये रसायनशास्त्र आणि गणित शिकवत होता. गेल्या काही काळापासून तो एकटाच राहत होता आणि त्याच्या घरमालकाने त्याला ५ मेपर्यंत फ्लॅट रिकामा करण्यास सांगितले होते. (Mira Road attack Case)
पोलीस तपासात असे समोर आले की, आरोपी जैब इंटरनेटवर सातत्याने कट्टरपंथी आणि आयएसआयएसशी संबंधित प्रचारात्मक व्हिडिओ पाहत होता. या संशयास्पद हालचालींमुळे आता नया नगर पोलिसांसोबत एटीएस देखील हा हल्ला एखाद्या मोठ्या दहशतवादी कटाचा भाग होता का, याचा तपास करत आहे. सध्या दोन्ही जखमी सुरक्षा रक्षकांवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. (Mira Road attack Case)