Eknath Shinde Kharip Meeting Thane : “इंटिग्रेटेड ग्राम विकास मॉडेल”ची मांडणी

जिल्ह्यातील १०० तलाव गाळमुक्त करण्याचे उद्दिष्ट्य उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदेच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम आढावा बैठक

Total Views |
EKNATH SHINDE (13)
 
ठाणे : (Eknath Shinde Kharip Meeting Thane) खरीप हंगाम आढावा बैठकीतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केवळ कृषीपुरते मर्यादित न राहता “इंटिग्रेटेड गाव विकास मॉडेल” मांडले असून या मॉडेलअंतर्गत शेती, जलसंधारण, हवामानाधारित नियोजन, आरोग्य सुविधा आणि घरांचे नियमितीकरण या सर्व घटकांना एकत्र जोडत ग्रामीण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप त्यांनी आपल्या दूरदृष्टीतून केला.
 
ठाणे जिल्हाधिकार्यालयात खरीप हंगामा बाबत सोमवार, दि.२७ रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करताना बोलत होते. शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे वळावे, शेणखत व जीवामृताचा वापर वाढवून “विषमुक्त शेती”ला चालना द्यावी, तसेच रासायनिक खतांमुळे खराब झालेली जमिनीची पोत सुधारण्यासाठी कृषी विभागाने विशेष प्रयत्न करावेत, अशा स्पष्ट सूचना दिल्या. त्यामुळे उत्पादन वाढ, खर्चात बचत आणि जमिनीचा दर्जा सुधारेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
 
या बैठकीला (Eknath Shinde Kharip Meeting Thane) आमदार किसन कथोरे, आमदार निरंजन डावखरे, आमदार राजेश मोरे, आमदार शांताराम मोरे, शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, नगरसेवक विकास रेपाळे, ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, उपजिल्हाधिकारी संदीप माने आणि जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी आणि जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.(Eknath Shinde Kharip Meeting Thane)
 
हेही वाचा :  Brihanmumbai Municipal Corporation : महापालिकेत कागदविरहित कामकाजाची मागणी!
 
ॲग्रो टॅक अंतर्गत सुमारे 93 हजार शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून दुबार पेरणी टाळण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाकडून मिळणाऱ्या माहितीनुसार यंदा सुमारे 92 टक्के पावसाचा अंदाज असून अलनिनोमुळे पावसात घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन पाण्याचे काटेकोर नियोजन, काटकसर आणि शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.(Eknath Shinde Kharip Meeting Thane)
या “इंटिग्रेटेड गाव विकास मॉडेल”मध्ये आरोग्य क्षेत्रालाही समान महत्त्व देण्यात आले असून “माझे गाव – आरोग्य संपन्न गाव” अभियानांतर्गत महिलांसाठी गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधासाठी एचपीव्ही लसीकरण मोहिम सुरू करण्यात आली आहे.(Eknath Shinde Kharip Meeting Thane)
 
याचबरोबर 500 ते 1500 चौरस फूट घरांचे नियमितीकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून 500 चौरस फूटपर्यंत कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, त्यामुळे नागरिकांवरील मोठा ताण कमी होणार आहे आणि या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.(Eknath Shinde Kharip Meeting Thane)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.