BMC Census Awareness : जनगणना २०२७ साठी व्यापक प्रचार-प्रसाराचे निर्देश
सेलिब्रिटी आणि खेळाडूंची मदत घेण्यावर भर
28-Apr-2026
Total Views |
मुंबई : (BMC Census Awareness) जनगणना २०२७ ही सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेला प्रचार-प्रसार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा यांनी सांगितले की, या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रभावशाली व्यक्ती, बॉलिवूड सेलिब्रिटी आणि खेळाडूंची मदत घ्यावी.
मनपाचे अतिरिक्त आयुक्त शर्मा यांनी हे निर्देश भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालय येथे आयोजित कार्यशाळेदरम्यान दिले. त्यांनी सांगितले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे होणाऱ्या या जनगणनेसाठी पालिकेने पूर्ण तयारी ठेवावी आणि विभागनिहाय गठित केलेल्या पथकांनी प्रचार-प्रसारासाठी विशेष प्रयत्न करावेत.(BMC census awareness)
डॉ. शर्मा यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की, आपल्या-आपल्या विभागातील प्रभावशाली व्यक्ती, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर आणि खेळाडूंशी आधीच संपर्क साधून १ मे २०२६ रोजी त्यांच्याकडून माहिती भरून घ्यावी. तसेच व्हिडिओ आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना जनगणनेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे.(BMC Census Awareness)
मुंबई क्षेत्रात जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात १ मे २०२६ ते १५ मे २०२६ दरम्यान स्वगणना प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यानंतर १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरभेट देऊन घर सूचीकरण आणि प्रत्यक्ष गणना करण्यात येणार आहे.(BMC Census Awareness)
या बैठकीला अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते. अधिकाऱ्यांना जनगणना २०२७ बाबत जनजागृती वाढवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करून जास्तीत जास्त नागरिकांना या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचे निर्देशही देण्यात आले.(BMC Census Awareness)