Asiatic Society Elections : मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे 'एशियाटिक टूमॉरो'चा नैतिक विजय!
डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांचे प्रतिपादन
28-Apr-2026
Total Views |
मुंबई (Asiatic Society Elections) : " एशियाटिक सोसायटीमध्ये बेकायदेशीर नोंदणी करत सदोष मतदार यादी तयार करण्यात आल्याच्या आमच्या आरोपांची मुंबई उच्च न्यायालयाच्या ताज्या निकालाने पुष्टी केली आहे. न्यायालयाचा निकाल म्हणजे एशियाटिक सोसायटीला अधिक समावेशक व सक्रिय संस्था बनवण्याच्या आमच्या भूमिकेवर आणि आमच्या सुधारणांच्या अजेंडावर उमटलेली पसंतीची मोहोरच आहे, त्यामुळे एकाप्रकारे हा 'एशियाटिक टूमॉरो' गटाचा नैतिक विजय आहे." असे प्रतिपादन एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे माजी उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.
दि. २८ एप्रिल रोजी मुंबईच्या प्रेस कल्ब येथे एशियाटिक टुमॉरो गटाच्या माध्यमातून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एशियाटिक टुमॉरो गटाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुंबई उच्च न्यायालयामध्ये दि. २३ एप्रिल रोजी एशियाटिकच्या निवडणूकीसंदर्भात धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या कुमार केतकर गटाला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला. या संदर्भात माहिती देताना डॉ. विनय सहस्त्रबुद्धे म्हणाले की "न्यायालयाचा निकाल म्हणजे एशियाटिक सोसायटीला अधिक समावेशक व सक्रिय संस्था बनवण्याच्या आमच्या भूमिकेवर आणि आमच्या सुधारणांच्या अजेंडावर उमटलेली पसंतीची गोहोरच आहे." आगामी जून महिन्यापर्यंत निवडणुका घेण्याची मागणी करतानाच, विनाकारण कायदेशीर लढाया करून अडथळे निर्माण करणान्यांनी आता तरी निवडणूक प्रक्रिया विनाविलंब पार पडू द्यावी, असा आग्रह त्यांनी धरला. गेल्या आठवड्यात, मुंबई उच्च न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांच्या १३ मार्च रोजीच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या दोन रिट याचिका फेटाळून लावल्या, "हा निकाल म्हणजे गेल्या वर्षभरात 'एशियाटिक टुमारो'ने माडलेल्या मरयदेशीर मुद्द्यांना मिळालेली सलग दुसरी पोचपावती आहे. विशेष म्हणजे, न्यायालयापासून लपवून ठेवलेली माहिती या निकालामुळे समोर आली असून चुकीच्या दाव्यांनी दिशाभूल करण्याचा प्रयत्न न्यायालयाने फेटाळून लावला आहे," असे सहस्रबुद्धे यांनी सांगितले. या प्रसंगी अॅड विक्रम वालावलकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालपत्राची तपशीलवार माहिती दिली. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर कुमार केतकर गच सर्वोच्च न्यायालया धाव घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर एशियाटिक टुमॉरो गटाच्या माध्यमातून कॅव्हियेट दाखल करण्यात आली असल्याची माहिती सुद्धा यावेळी डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी दिली.
विरोधकांनी वेळकाढूपणा करु नये! : डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
"एशियाटिक टुमॉरो' म्हणून उद्याची एशियाटिक सोसायटी घडवण्याची कार्यसूची घेऊन आम्ही ही निवडणूक लढवत आहोत, तर आम्हाला विरोध करणाऱ्यांना जुनीच अपारदर्शक, हडेलहप्पी व्यवस्था कायम ठेवायची आहे. विरोधकांनी वेळकाढूपणा न करता न्यायव्यवस्थेचा आदर करावा आणि धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशानुसार निवडणुका होऊ द्याव्यात.आमचे 'एशियाटिक टुॉरी' पॅनेल एशियाटिक सोसायटीच्या हितासाठी निष्पक्ष, पारदर्शक आणि वैळेवर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे."