Social Initiative : सामाजिक बांधिलकीचा सुंदर आविष्कार: भव्य सामूहिक विवाह सोहळा! - मनिषा चौधरी

पं. दीनदयाळ उपाध्याय कन्यादान योजने"ला १४ वर्षे पूर्ण

    27-Apr-2026
Total Views |
social initiative
 
मुंबई : (Social Initiative) "भारतीय जनता पक्ष आणि 'बाप्पा सिताराम सेवा मंडळ' यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच आमदार योगेश सागर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत असलेल्या 'पं. दीनदयाळ उपाध्याय कन्यादान योजने'ला १४ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच अनुषंगाने आयोजित भव्य सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होण्याचा सन्मान मिळाला.अनेक नवदांपत्यांचे विवाह विधिवत पार पडताना पाहणे, हा खरोखरच अत्यंत आनंदाचा आणि समाधानाचा क्षण होता. नववधू-वरांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यांतील समाधान पाहून, 'हीच आपल्या सार्वजनिक जीवनातील खरी कमाई आहे', याची पुन्हा एकदा जाणीव झाली. या उपक्रमातून (Social Initiative) समाजातील गरजू कुटुंबांना मोठा आधार मिळत असून, अनावश्यक खर्चाला फाटा देत साधेपणा आणि एकतेचा एक अत्यंत सकारात्मक संदेश दिला जात आहे." अशी प्रतिक्रिया भाजप आमदार मनिषा चौधरी यांनी केले आहे.(Social Initiative)
 
हेही वाचा :   Maharashtra Health Committees Revamp : आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत सर्व आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन करावे
 
"या भव्य आणि यशस्वी आयोजनासाठी आयोजक मंडळ, सर्व कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
सर्व नवविवाहित दांपत्यांना सुखी, समृद्ध आणि मंगलमय वैवाहिक जीवनासाठी भरभरून शुभेच्छा! त्यांच्या आयुष्यात सदैव प्रेम, विश्वास आणि यशाची भरभराट होवो, हीच सदिच्छा." असेही चौधरी म्हणाल्या आहेत.(Social Initiative)