Mumbai Pune Expressway : ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे महाराष्ट्रदिनी लोकर्पण
मुंबई - पुणे प्रवास सुसाट वेगात होणार
महाराष्ट्रातील अभियांत्रिकी वेधणार देशाचे लक्ष
नवीन टोलवाढ नाही; चारचाकी आणि बस वाहतुकीस मिळणार परवानगी
27-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Mumbai Pune Expressway) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे येत्या महाराष्ट्र दिनी शुक्रवार, दि. 1 मे रोजी लोकार्पण करण्यात येईल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होईल. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवार, दि.२६ रोजी प्रकल्प पाहणी केली.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी नगरसेवक आबासाहेब बागुल, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि एमएसआरडीसी, एफ्कॉन आणि नवयुग कंपनीचे सर्व प्रमुख अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते. (Mumbai Pune Expressway)
दरम्यान यशवंतराव चव्हाण मुंबई -पुणे द्रुतगती महामार्ग 'मिसिंग लिंक' प्रकल्पाचे 99 टक्के काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे बोर घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सिग्नल-फ्री होईल.(Mumbai Pune Expressway)
या 19 किलोमीटर लांबीच्या एकूण प्रकल्पात सुमारे १०.५ किलोमीटर काम सार्वधिक आव्हानात्मक मानले जाते. दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे १८२ मीटर उंच केबल-स्टेड पूल हि अत्यंत आव्हानात्मक कामगिरी सुमारे २३.७५ मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. ७० किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला आहे. तर ८.९ किलोमीटर लांबीचा अयिशातील सर्वात लांब आणि सर्वाधिक रुंद बोगदा हा लोणावळा तलावाच्या १८२ मीटर खालून जातो आहे. मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर प्रवासाचा वेळ सुमारे २० ते ३० मिनिटांनी कमी होईल. (Mumbai Pune Expressway)
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले, “मी स्वतः येथे येऊन कामाची गुणवत्ता तपासली असून काम समाधानकारक झाले आहे. उर्वरित किरकोळ कामे पुढील काही दिवसांत पूर्ण होतील. वेळेत आणि उच्च दर्जाने काम पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत,” असे त्यांनी सांगितले. (Mumbai Pune Expressway)
पुढे ते म्हणाले, "सुरुवातीच्या टप्प्यात हलकी वाहने आणि बसांना प्राधान्य देण्यात येणार असून त्यामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल. मिसिंग लिंक प्रकल्पामुळे टोलमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. खालापूर टोल नाक्यावरही सध्या कोणतीही वाढ प्रस्तावित नाही.” (Mumbai Pune Expressway)