Legislative Council : महाविकास आघाडीत तीन तिघाडा,विधान परिषदेत मतफुटीची शक्यता - नवनाथ बन
27-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Legislative Council) भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्या “मतं सांभाळा” या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित करताना सोमवार दि.२७ रोजी असे प्रतिपादन केले की," हा सल्ला नेमका उद्धव ठाकरे यांनाच दिला आहे का ? महाविकास आघाडीत एकच जागा असताना अंतर्गत संघर्ष तीव्र झाला आहे. “तीन तिघाडा आणि काम बिघाडा” अशी परिस्थिती असून तिन्ही पक्ष वेगवेगळ्या दिशेला खेचत असल्याने एकमत होण्याची शक्यता कमी आहे. या पार्श्वभूमीवर मतफूट होऊन निवडणुकीत पराभवाचा धोका आहे."
संजय राऊत यांच्या ‘लेबर पेन’ संदर्भातील वक्तव्यावर नवनाथ बन यांनी जोरदार टीका करताना म्हटले की," निवडणुकांमध्ये सातत्याने अपयशी ठरलेल्या पक्षाने अशा तुलना करणे हास्यास्पद आहे. विधानसभा, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समाधानकारक कामगिरी न करता अशा उपमा देणे योग्य नाही. जनतेने नाकारलेल्या राजकारणातून अशा विधानांचा जन्म होतो."(Legislative Council)
"महायुतीत एकजूट कायम असून, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार हे एकत्रितपणे काम करत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीत उमेदवार ठरवताना अटी-शर्ती लादल्या जात असल्याने मतभेद स्पष्ट होत आहेत. काँग्रेसकडून राज्यसभेच्या जागेच्या बदल्यात समर्थनाची अट घालण्यात आली आहे." असेही बन म्हणाले.(Legislative Council)
नवनाथ बन यांनी आरोप केला की," संजय राऊत हेच उद्धव ठाकरे यांच्या उमेदवारीस अडथळा ठरत आहेत. आगामी राज्यसभा निवडणुकांच्या (Legislative Council) पार्श्वभूमीवर स्वतःची राजकीय भूमिका मजबूत करण्यासाठी राऊत अशा प्रकारचे इशारे देत आहेत. “मतं फुटू शकतात” असे सांगून ठाकरे यांना निवडणुकीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न होत आहे."
"के इ एम रुग्णालयाच्या नामांतरावरून निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना बन म्हणाले," एकलव्याच्या नावाला विरोध का केला जातो? हा निर्णय गुलामीच्या खुणा पुसण्याचा प्रयत्न असून वादाद्वारे विरोधकांचा दुटप्पीपणा उघड होत आहे.उर्दू भवन तसेच काही ऐतिहासिक स्थळांच्या सुशोभीकरणावेळी विरोधक शांत होते, मात्र आता नामांतरावर आक्षेप घेत आहेत. एकलव्याच्या नावाला विरोध करणे ही दुटप्पी भूमिका आहे."असेही बन म्हणाले.
मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना बन यांनी स्पष्ट केले की, "महाराष्ट्रात राहण्यासाठी मराठी येणे आवश्यक आहे. मात्र तिच्या नावाखाली होणाऱ्या हिंसाचाराला समर्थन दिले जाणार नाही."(Legislative Council)
सोशल मीडियावर फेक फॉलोअर्स तयार करण्याचा आरोप करत बन यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर निशाणा साधला. अशा प्रकारांना भाजप भीक घालत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.(Legislative Council)