Chandrashekhar bawankule : महाराष्ट्र आणि मराठी प्रत्येकाच्या रक्ता रक्तामध्ये आहे - चंद्रशेखर बावनकुळे

ज्याला मराठी येत नाही तो शिकेल - नितेश राणे

    27-Apr-2026
Total Views |
CHANDRASHEKHAR BAWANKULE

मुंबई : (Chandrashekhar bawankule) "महाराष्ट्र आणि मराठी प्रत्येकाच्या रक्ता रक्तामध्ये आहे. ही मातृभाषा शिकवण्याच्या कोणीही आड येऊ नये. पुढील विकसित भारत, विकसित महाराष्ट्राचा काळ हा मातृभाषेलाच आधार धरून पुढे नेण्याचा आहे.असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar bawankule) यांनी रविवार दि.२६ रोजी केले.
 
"महाराष्ट्र सरकार म्हणून महायुती सरकार म्हणून मराठी भाषा आमच्या महाराष्ट्रात सक्तीची आहेच.प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आम्ही सर्व मंत्र्यांनी केल आहे. मराठी प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि ज्याला येत नाही तो शिकेल कोणी शिकणारच नाही असा कोणीही नाही आहे. या मुद्द्यावर वाद करू नये अशा मताचा मी आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संजय निरुपम यांना समजवतील एकनाथ शिंदे सक्षम आहेत." असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केले.(Chandrashekhar bawankule)
 
हेही वाचा : Maharashtra Transport Rules : व्यवहार्य मराठी भाषा सक्ती संदर्भात दि.२७ रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बोलवली बैठक
 
"ज्याला इथे व्यवसाय करायचा आहे तो नक्कीच मराठी शिकणार. पण त्या निमित्ताने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. आणि हिंदूंना आम्ही मारू अशा सुक्या धमक्या आमचे हिंदुत्ववादी सरकार असताना तरी देऊ नयेत. ज्यांना मराठी शिकायचे आहे त्यांना आम्ही पुस्तक देऊ, ट्रेनिंग देऊ, काय वाटेल ते करू. सरकारच्या नियमांचे पालन सगळे अमराठी, उत्तर भारतीय नक्कीच करतील. जेव्हा एम आय एम ची नगरसेवक बोलते की मला मराठी येत नाही तेव्हा हे कागदी वाघ कुठे जातात, तेव्हा का गप्प बसतात. हिरव्या सापांना ठेचण्याची हिंमत नाही का? जो नियम तुम्ही हिंदू समाजाला लावता तोच नियम अन्य धर्मांना पण लावा मग आम्हाला कळेल. मुस्लिम समाजाचे किती चालक मराठी बोलतात हे पण विचारावे. आम्ही असताना कोणीही हिंदूंच्याकडे वाकड्या नजरेने बघणार नाही." असेही मंत्री राणे म्हणाले.(Chandrashekhar bawankule)