Bangladesh priest death : बांगलादेशात मंदिराच्या गुरवाचा संशयास्पद मृत्यू; झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

अल्पसंख्याक संघटनांचा संताप, कठोर कारवाईची मागणी

    27-Apr-2026   
Total Views |
Bangladesh priest death
 
मुंबई : (Bangladesh priest death) बांगलादेशात एका हिंदू मंदिराची देखभाल करणारा गुरव बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. मात्र आता त्याच व्यक्तीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. या घटनेनंतर अल्पसंख्याक संघटनांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. 
(Bangladesh priest death)
 
मिळालेल्या माहितीनुसार, नयन साधू (वय ४०) यांचा मृतदेह कॉक्स बाजार जिल्ह्यातील एका गावाच्या बाहेरील डोंगराळ भागात सापडला. १९ एप्रिल रोजी दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना घेऊन गेल्याचा आरोप असून, त्यानंतर तीन दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला. साधू हे चट्टोग्राम जिल्ह्यातील स्थानिया उपजिल्ह्यातील दोहाजारी परिसरातील रहिवासी होते. ते खुरुषकुल युनियनमधील शिवकाली मंदिरात देखभाल करणारे गुरव आणि पुजारी म्हणून काम करत होते. 
(Bangladesh priest death)
 
हेही वाचा :  West Bengal Election 2026: २९ एप्रिलपूर्वी बंगाल सोडा, नाहीतर…! पंतप्रधान मोदींचा घुसखोरांना थेट इशारा
 
ही घटना खून आहे की आत्महत्या, याबाबत पोलिसांनी अद्याप कोणतीही खात्री दिलेली नाही. मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिलने या घटनेचा निषेध करत तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. (Bangladesh priest death)
 
बांगलादेश पूजा सेलिब्रेशन कौन्सिलच्या कॉक्स बाजार युनिटनेही चिंता व्यक्त केली असून, सरचिटणीस जॉनी धर यांनी परिस्थिती पाहता हा खून असल्याचा संशय व्यक्त केला आहे. साधू यांच्या पत्नीने १९ एप्रिल रोजी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक संघटनांनी चिंता व्यक्त केली आहे. युनिटी कौन्सिलच्या माहितीनुसार, यावर्षी १ जानेवारी ते ३१ मार्चदरम्यान बांगलादेशमध्ये सांप्रदायिक हिंसाचाराच्या १३३ घटना नोंदवल्या गेल्या आहेत.(Bangladesh priest death)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक