मुंबई : (Raghu Rai) आपल्या छायाचित्रांच्या माध्यमातून भारतीय समाजजीवनाचे दर्शन घडवणाऱ्या प्रख्यात छायाचित्रकार यांचे ८३ व्या वर्षी निधन झाले. दि. २६ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता दिल्लीतील लोधी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पाच दशकांहून अधिक काळ छायाचित्रांच्या जगामध्ये ठसा उमटवणाऱ्या रघु राय यांना छायाचित्र पत्रकारितेचे जनक मानलं जात असे.(Raghu Rai)
रघु राय बऱ्याच काळापासून कॅन्सरशी झुंज देत होते. रघु राय यांच्या मुलाने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांना प्रोस्टेट कॅन्सरचं निदान झालं होतं. उपचारांनंतर ते बरे झाले, पण नंतर कॅन्सर त्यांच्या पोटात पसरला. अलीकडेच, वयोमानानुसारच्या गुंतागुंतीमुळे हा आजार त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचला आणि त्यामुळे त्यांचं निधन झालं. रघु राय यांच्या पश्चात पत्नी गुरमीत, मुलगा नितीन आणि मुली लगन, अवनी व पूर्वाई असा परिवार आहे.(Raghu Rai)
१८ डिसेंबर १९४२ रोजी झांग (आता पाकिस्तानात) येथे जन्मलेले राय, यांच्या कार्याचा गौरव केवळ भारतातच नव्हे तर जगभरात केला गेला. त्यांनी १९६० च्या दशकाच्या मध्यात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. नंतर, ते ' द स्टेट्समन'मध्ये स्टाफ फोटोग्राफर म्हणून रुजू झाले.१९७६ मध्ये, त्यांनी स्वतंत्रपणे फ्रीलान्स छायाचित्रकार म्हणून काम करण्यासाठी वृत्तपत्रातील नोकरी सोडली. १९८२ ते १९९२ पर्यंत त्यांनी इंडिया टुडेमध्ये छायाचित्रण संचालक म्हणून काम केले. तसेच, १९९० ते १९९७ दरम्यान त्यांनी वर्ल्ड प्रेस फोटोसाठी परीक्षक मंडळातही काम पाहिले.(Raghu Rai)
पाच दशकांहून अधिक काळ कार्यरत असणाऱ्या रघु राय यांनी भारतातील महत्वपूर्ण घटनांचे छायाचित्रण केले. राय यांच्या छायाचित्रणाला अनेकदा आधुनिक भारताची 'दृश्य नोंद' म्हणून संबोधले जाते. इतिहासातील सर्वात भीषण औद्योगिक दुर्घटनांपैकी एक असलेल्या भोपाळ वायू दुर्घटनेनंतर त्यांनी प्रभावी छायाचित्रे टिपली. त्याच वेळी, त्यांनी अनेक सुप्रसिद्ध व्यक्तींची छायाचित्रं देखील काढली.(Raghu Rai)
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.