Navnath Ban : “शिवरायांवर बोलण्याआधी राऊतांनी माफी मागावी - नवनाथ बन यांची मागणी ”

“बागेश्वर बाबांच्या वक्तव्याचा निषेध; पण राऊतांना नैतिक अधिकार नाही”

    26-Apr-2026
Total Views |
Navnath Ban
 
मुंबई : (Navnath Ban) भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी रविवार दि.२६ रोजी स्पष्ट केले की," बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचे समर्थन कुणीही करत नाही आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याचा निषेधच केला आहे. मात्र संजय राऊत यांना शिवाजी महाराजांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण त्यांनी पूर्वी शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागून अपमान केला होता. त्याबद्दल त्यांनी अद्याप माफी मागितलेली नाही. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांनी शिवरायांचा सन्मान करण्याची भाषा करू नये."(Navnath Ban)
 
नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवत म्हटले की, "दिल्लीसमोर कोण झुकले हे पाहायचे असेल तर उद्धव ठाकरे आणि त्यांचा गट पाहावा. सत्तेसाठी काँग्रेससमोर लोटांगण घालून मुख्यमंत्रीपद मिळवणाऱ्यांनी स्वाभिमानाची भाषा करू नये. भाजपने बागेश्वर बाबांच्या वक्तव्याचे समर्थन केलेले नाही, पण टिपू सुलतान आणि शिवाजी महाराजांची तुलना करणाऱ्यांविरोधात राऊत आणि ठाकरे गप्प का होते."(Navnath Ban)
 
नवनाथ बन यांनी संजय राऊतांच्या हिंदुत्वावर सवाल उपस्थित करत म्हटले की," याकूब मेमनच्या कबरीचे सुशोभीकरण, नमाज पठण स्पर्धा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा ‘जनाब’ असा उल्लेख हेच का त्यांचे हिंदुत्व आहे? बागेश्वर बाबा चुकीचे असतील तर त्यांचा निषेध होतो, पण ते हिंदुत्वाची भूमिका मांडतात. मात्र उबाठा गट सत्तेसाठी हिंदुत्व विकून काँग्रेससमोर झुकला आहे. हिंदू साधुसंतांचा अपमान करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही."(Navnath Ban)
 
हेही वाचा : BJYM Mumbai Event : भाजयुमो कडून " मन की बात – जेन नेक्स्ट के साथ” कार्यक्रमाचे आयोजन 
 
नवनाथ बन यांनी आरोप केला की, "पाटकर भगिनींना धमक्या देणाऱ्या टोळ्यांवरून राऊतांनी भूमिका स्पष्ट करावी. शिवाजी महाराज असते तर अशा प्रवृत्तींचा कडेलोट झाला असता. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक दिवसही सुट्टी न घेता देशसेवा करतात. उलट उद्धव ठाकरे अडीच वर्षांच्या कार्यकाळात मंत्रालयात क्वचितच दिसले."(Navnath Ban)
 
नवनाथ बन यांनी स्पष्ट केले की, "एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भगोडे म्हणणे चुकीचे आहे. २०२९ मध्ये हिंदुत्व सोडून काँग्रेससोबत जाणे हेच खरे भगोडेपण होते. २०२४ च्या निवडणुकीत जनतेने शिंदे आणि अजित पवार यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे स्पष्ट झाले आहे."(Navnath Ban)
 
नवनाथ बन म्हणाले की, "राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे.मराठी अनिवार्य असली पाहिजे. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात उर्दू भवन बांधणे, उर्दूमध्ये कॅलेंडर आणि पत्रके छापणे हे कोणी केले. मराठीच्या नावावर राजकारण करणाऱ्यांचा दुटप्पीपणा जनतेसमोर आला आहे."(Navnath Ban)
 
नवनाथ बन यांनी सांगितले की, "केईएम रुग्णालयाचे नामांतर करून ‘एकलव्य रुग्णालय’ करण्याची मागणी ही गुलामगिरीच्या खुणा पुसण्याचा प्रयत्न आहे. इंग्रजांच्या काळातील नावे बदलणे आवश्यक आहे. मात्र संजय राऊत यांना याचा विरोध का आहे ? गुलामगिरीची मानसिकता सोडून भारतीय अभिमान जपण्याची वेळ आली आहे."(Navnath Ban)