BJYM Mumbai Event : भाजयुमो कडून " मन की बात – जेन नेक्स्ट के साथ” कार्यक्रमाचे आयोजन
26-Apr-2026
Total Views |
मुंबई : (BJYM Mumbai Event) भाजपाच्या ४६ व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून भाजयुमो मुंबईकडून मुंबईतील ४६ ठिकाणी “मन की बात – जेन नेक्स्ट के साथ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.(BJYM Mumbai Event)
भारतीय जनता पक्षाने ६ एप्रिल २०२६ रोजी आपल्या स्थापनेची ४६ वर्षे पूर्ण केली. त्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चा, मुंबईतर्फे भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील ४६ विविध क्लासेस व ट्यूटोरियल्स येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात – जेन नेक्स्ट के साथ” कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश नव्या पिढीतील युवकांपर्यंत पंतप्रधानांचे दूरदर्शी विचार आणि देशाच्या विकासाची संकल्पना प्रभावीपणे पोहोचवणे हा होता. या विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांना मुंबईतील हजारो युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.(BJYM Mumbai Event)
यावेळी भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांनी सांगितले की, “भारतीय जनता पक्षाने ६ एप्रिल २०२६ रोजी स्थापना दिनाची ४६ वर्षे पूर्ण केली आहेत. या गौरवशाली प्रवासाच्या निमित्ताने आम्ही मुंबईभरातील ४६ क्लासेस व ट्यूटोरियल्स मध्ये ‘मन की बात – जेन नेक्स्ट के साथ’ कार्यक्रम आयोजित केला. या माध्यमातून १८ ते २५ वयोगटातील युवकांना पंतप्रधानांच्या विचारांशी थेट जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा युवकांवर दृढ विश्वास आहे आणि हा कार्यक्रम त्या विश्वासाचे प्रत्यक्ष रूप आहे. आमचे ध्येय आहे की मुंबईतील प्रत्येक युवक ‘विकसित भारत’ या संकल्पनेशी जोडला जावा आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग नोंदवावा. स्थापना दिनाच्या या पवित्र प्रसंगी, युवा मोर्चा युवकांना राष्ट्रसेवेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहे.”(BJYM Mumbai Event)
या कार्यक्रमाद्वारे तंत्रज्ञान, नवोन्मेष, शिक्षण आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या विषयांवरील पंतप्रधानांचे विचार युवकांपर्यंत पोहोचवण्यात आले. मुंबईतील विविध भागांमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमांमध्ये भाजयुमो मुंबईचे पदाधिकारी, जिल्हा, मंडळ व वॉर्ड स्तरावरील कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने प्रथमच मतदान करणारे युवक सहभागी झाले.(BJYM Mumbai Event)