Western Express Highway repair : पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग होणार खड्डेमुक्त!
मॅस्टिक डांबराचा वापर; ५० कोटींचा खर्च पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यावर भर
25-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Western Express Highway repair) शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी महापालिकेकडून मोठे पाऊल उचलण्यात आले असून, पूर्व द्रुतगती महामार्ग, मुक्तमार्ग आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी सुमारे ५० कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासाठी शुक्रवारी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महापालिकेने शहर व उपनगरातील रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीसाठी आधीच ४२ कोटींची तरतूद केली आहे. त्यासोबतच आता प्रमुख द्रुतगती मार्गांवरील दुरुस्तीवर विशेष भर देण्यात येत आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग व मुक्तमार्गावरील खराब रस्त्यांसाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च होणार असून, पश्चिम द्रुतगती महामार्गावरील मुख्य व सेवा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आणखी २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.(Western Express Highway repair)
या दुरुस्तीसाठी ‘मॅस्टिक’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या पद्धतीमुळे रस्ते अधिक टिकाऊ राहतात आणि पावसाळ्यात खड्डे निर्माण होण्याची शक्यता कमी होते, असे तज्ञांचे मत आहे.(Western Express Highway repair)
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी खड्ड्यांचा मुद्दा ऐरणीवर येत असताना, या निर्णयामुळे वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाणही कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, निविदा प्रक्रिया ७ मे रोजी अंतिम होणार असून, पात्र कंत्राटदारांची नियुक्ती करून कामे तातडीने सुरू केली जाणार आहेत. पावसाळ्यापूर्वीच ही दुरुस्ती पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचे सांगण्यात आले.(Western Express Highway repair)