Leader Dilip Godambe : भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीप गोडांबे यांचे निधन

    25-Apr-2026
Total Views |
bjp leader dileep godambe
 
मुंबई :  (Leader Dilip Godambe) भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप गोडांबे यांचे गुरुवार दि.२३ रोजी निधन झाले आहे.त्याबद्दल भाजप परिवारातून दुःख व्यक्त केले जात आहे.
 
"भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप गोडांबे (Leader Dilip Godambe)जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. पक्षाच्या वाढीसाठी आणि संघटन बळकट करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर निष्ठेने कार्य केले. जनतेच्या प्रश्नांबाबत त्यांची बांधिलकी आणि समाजसेवेची तळमळ सदैव प्रेरणादायी राहील.त्यांच्या जाण्याने पक्षाने एक कर्तव्यदक्ष, निष्ठावंत आणि समर्पित कार्यकर्ता गमावला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, ही प्रार्थना.ॐ शांती." असा शोकसंदेश मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी गुरुवार दि.२३ रोजी दिला आहे.(Leader Dilip Godambe)
 
हेही वाचा :  deepak singh yuva morcha president : महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ युवतींचा व्यापक आक्रोश आंदोलन
 
"भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप गोडांबे जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो." असा शोक संदेश आचार्य पवन त्रिपाठी यांनी दिला आहे.(Leader Dilip Godambe)
 
मुंबईतील स्वीकृत नगरसेवक प्रतीक कर्पे यांनीही दिलीप गोडांबे यांना श्रद्धांजली वाहिली आहे.(Leader Dilip Godambe)