Goda to Narmada Jal Yatra : महिला, गरीब, आदिवासीना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य अहिल्यादेवी होळकर यांनी केले - देवेंद्र फडणवीस

    25-Apr-2026
Total Views |
goda narmada yatra
 
मुंबई : (Goda to Narmada Jal Yatra) "अहिल्यादेवी होळकर यांनी नद्यांचे महत्व जाणले आणि नदी प्रदूषण रोखण्याचे प्रयत्न केले. महिला, गरीब आदिवासीना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांनी केले. त्यांचे विचार आजही महत्वाचे आणि मार्गदर्शक असून छत्रपती शिवाजी महाराज आणि अहिल्यादेवी होळकर यांच्यासारख्या महान व्यक्तींच्या विचारांच्या आधारेच शाश्वत विकास साधता येईल." असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे जलसंपदा विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा (Goda to Narmada Jal Yatra)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवार दि.२५ रोजी भव्य शुभारंभ करण्यात आला.(Goda to Narmada Jal Yatra)
 
यावेळी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, इंदूर संस्थानचे श्रीमंत युवराज महाराज यशवंतराव होळकर, अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, नाशिकच्या महापौर हिमगौरी आडके, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर आदी उपस्थित होते.(Goda to Narmada Jal Yatra)
 
 
"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे विचार, वारसा आणि विकास हा त्रिसूत्री मंत्र घेऊन ‘गोदा ते नर्मदा’ ही यात्रा करण्यात आली आहे. वेदात नदीचे महात्म्य वर्णन केले असून नदीला आई मानले आहे. नदी स्तुती सुक्तात ऋषींमुनींनी नदीच्या उपयुक्ततेचे वर्णन केले आहे. वारशाचे संवर्धन आणि विकास याचा समन्वय देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रासह आंध्रप्रदेशासाठी महत्वाची असल्याने ती बारमाही प्रवाहित राहावी यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत.असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोदा ते नर्मदा जलयात्रेच्या शुभारंभा वेळी म्हणाले.(Goda to Narmada Jal Yatra)
 
"नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून येत्या सिंहस्थ कुंभमेळा २०२७ निमित्ताने निर्मळ आणि अविरल गोदावरीसाठी प्रयत्न करणार." अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.(Goda to Narmada Jal Yatra)
 
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जलव्यवस्थापनातील योगदानाचे स्मरण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्‍हणाले, "अहिल्यादेवी होळकर यांनी घाट, बारव यांची निर्मिती करतांना अध्यात्मिकता आणि उपयुक्तता याचा समन्वय साधला. पाण्याचे महत्व लक्षात घेऊन जलव्यवस्थापनावर भर दिला. त्यांनी निर्माण केलेले बारव आजही सुस्थितीत असून त्याचे संवर्धन राज्य शासन करेल."