Girish Mahajan : मोर्च्या ठिकाणच्या ' त्या ' महिलेविरोधात झेन सदावर्ते यांची पोलिसात तक्रार
25-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Girish Mahajan) जनआक्रोश मोर्चातील सहभागी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी तसेच पोलिस अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून चुकीचे शब्द वापरणाऱ्या आणि मोर्चात सहभागी महिलांवर बाटल्या फेकणाऱ्या महिलेविरोधात ऍड. गुणरत्न सदावर्ते यांची कन्या झेन सदावर्ते यांनी वरळी पोलीस स्थानकात गुरुवार दि.२३ रोजी तक्रार दाखल केली आहे.
नारीशक्ती वंदन व मतदार संघ पुनर्रचनाबाबत दुरुस्ती विधेयक संसदेत नामंजूर झाल्याने भाजपच्यावतीने मंगळवार दि.२१ रोजी मुंबईत जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.यात हजारोंच्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.तसेच भाजपचे अनेक मोठे नेते आणि शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.यावेळी एका महिलेने येऊन वाहतूक कोंडी विषयी राग व्यक्त करताना मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan), पोलीस अधिकारी आणि महिलांशी अपमानजनक वक्तव्य आणि वर्तन केले होते.यावेळी महाजन यांच्यासह पोलिसांनी त्या महिलेस शांत करण्याचा प्रयत्न केला होता आणि वाहतूक कोंडीबद्दल क्षमा देखील मागितली होती.(Girish Mahajan)
त्यानंतर देखील महिलेने आपला राग व्यक्त केला होता.यावेळी रीतसर तक्रार न देता राग व्यक्त करणाऱ्या महिलेचे वर्तन कायद्याला धरून होते का ?असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.मोर्चा,रॅली फक्त भाजपच काढते का ? सर्वच पक्ष काढत असतात आणि त्यावेळी वाहतूक कोंडी होत असते वाहतूक कोंडी होणे ,नागरिकांना त्रास होणे चुकीचे आहे पण याबद्दल प्रतिक्रिया देण्याची पद्धत देखील चुकीची होती असेही मोर्चात सहभागी महिलांचे म्हणणे होते. (Girish Mahajan)
" सरकारी अधिकाऱ्यांविषयी बोलणाऱ्या तुम्ही कोण आहात.मी एक भारतीय नागरिक म्हणून या गोष्टीच्या विरुद्ध आहे.तिथे कॅमेरा होते म्हणून तुम्ही गिरीश महाजन यांच्याशी अपमानास्पकद वागलात का ? या मागचा तुमचा उद्देश काय होता." असे प्रश्न झेन सदावर्ते यांनी यावेळी प्रसार माध्यमातून त्या महिलेस विचारले आहेत. (Girish Mahajan)