Dahisar Voter Camp : सक्षम लोकशाहीसाठी प्रत्येक मतदार महत्त्वाचा- मनिषा चौधरी

    25-Apr-2026
Total Views |
 
manisha chaudhari
 
मुंबई : ( Dahisar Voter Camp) "सक्षम लोकशाहीसाठी प्रत्येक मतदार महत्त्वाचा! नागरिकांनीही या कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद देत या उपक्रमाचे स्वागत केले असून अशा उपक्रमांमुळे नागरिकांचा मतदार नोंदणी प्रक्रियेतील सहभाग वाढतो आणि लोकशाही खऱ्या अर्थाने मजबूत होते." असे प्रतिपादन आमदार मनिषा चौधरी यांनी केले. स्व. गोपीनाथ मुंडे मैदान, दहिसर (पश्चिम)विधानसभेतील वॉर्ड क्रमांक ०८ येथील एस. आय.आर.(पद्धतशीर सखोल पुनरावलोकन) कॅम्पला शनिवार दि. २५ रोजी भेट दिली यावेळी त्या बोलत होत्या. (Dahisar Voter Camp)
 
हेही वाचा : Pension Scheme for Elderly Artists : वृद्ध कलावंतांची प्रलंबित आधार पडताळणी तात्काळ करा- मंत्री ॲड.शेलार यांचे निर्देश
 
"या कॅम्पच्या माध्यमातून मतदार यादी अद्ययावत करणे, नोंदणी प्रक्रियेतील त्रुटी दूर करणे आणि नागरिकांना योग्य माहिती देणे, अशा अत्यंत महत्त्वपूर्ण बाबींवर युद्धपातळीवर काम सुरू आहे. या भेटीदरम्यान उपस्थित बी. एल. ओ.अधिकारी आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, सूचना आणि अनुभव जाणून घेतले. कॅम्पमध्ये येणाऱ्या नागरिकांना नवीन मतदार नोंदणी, दुरुस्ती, तसेच नाव समाविष्ट करणे किंवा वगळणे याबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर मार्गदर्शन केले जात असल्याचे पाहून समाधान वाटले."असेही चौधरी यांनी स्पष्ट केले. (Dahisar Voter Camp)