Navnath Ban : राऊत स्वतःच दुःशासनाच्या भूमिकेत - नवनाथ बन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे भेटीच्या बातम्या तथ्यहीन

    25-Apr-2026
Total Views |
navnath ban
 
मुंबई : (Navnath Ban) "महाभारताचा उल्लेख राऊत यांनी केलाच आहे तर दुर्योधनासोबत असलेल्या आणि स्वतः दुःशासनाच्या भूमिकेत असलेल्या राऊत यांनी स्वतःची भूमिका पहावी.धर्माच्या बाजूने उभे राहणाऱ्याना इतिहास मान्यता देतो.त्यामुळेच राघव चड्डा यांनी योग्य बाजूची निवड केली आहेे.जेव्हा चड्डासह आपचे हे नेते इंडिया आघाडीत होते तेव्हा ते मास लीडर मात्र भाजपात आल्यावर त्यांच्यावर आरोप होतात हा दुटप्पीपणा आहे."असे ऱोखठोक प्रतिपादन भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवार दि.२५ रोजी केले. ( Navnath Ban)
 
"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कथित भेटीच्या बातम्या पूर्णतः निराधार, बिनबुडाच्या आणि धादांत खोट्या आहेत. ज्या समाजमाध्यम हॅण्डलवरून अशा अफवा पसरवल्या जात आहेत, त्यांनाही कायदेशीर नोटीस देऊन कारवाई जाईल." असेही बन यांनी स्पष्ट केले. ( Navnath Ban)
 
"राऊत यांची जेलवारी कोणत्याही आंदोलनासाठी नाही तर आर्थिक गैरव्यवहारामुळे झाली होती.पत्राचाळ प्रकरणात मराठी माणसांना बेघर केल्यामुळेच त्यांना तुरुंगात जाव लागल."असेही बन यांनी स्पष्ट केले. ( Navnath Ban)
 
हेही वाचा :  Maharashtra Legislative Assembly Vote Counting : विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी
 
"भाजपवर फोडाफोडीचा आरोप म्हणजे विरोधकांचा स्वतःचा पराभव झाकण्याचा प्रयत्न असून भाजपने कुणालाही जबरदस्तीने आणले नाही तर स्वतःच्या विचारानुसार निर्णय घेऊनच एकनाथ शिंदे आणि स्व.अजित पवार यांनी भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतला होता."असेही बन म्हणाले. ( Navnath Ban)
 
"राऊत हिंदू विचारांपासून दूर गेले असून मतांसाठी औरंगजेबचा आधार घेत आहेत.पण हिंदू परंपरेचा आणि संस्कृतीचा आदर करणाऱ्यांनाच समाज मान्यता देतो. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी.तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानशी करणे हे अक्षम्य असून अशा वक्तव्यांवरदेखील कारवाई व्हावी." अशी भूमिका बन यांनी मांडली. ( Navnath Ban)