S.N.D.T. Women's University : एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात महापुरुषांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन

    24-Apr-2026
Total Views |
 
Dr. babasaheb ambedkar 135th birth anniversary
 
मुंबई : (S.N.D.T. Women's University) एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ कर्मचारी परिषद आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन विद्यापीठाच्या चर्चगेट कॅम्पसमधील पाटकर हॉल येथे करण्यात आले. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, महर्षी कर्वे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधण्यात आले.
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव होत्या. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात या महापुरुषांच्या विचारांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अधोरेखित केले. विद्यार्थिनींनी या विचारांचा अभ्यास करून समाजकार्यात सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले.(S.N.D.T. Women's University)
 
हेही वाचा  : Pension Scheme for Elderly Artists : वृद्ध कलावंतांची प्रलंबित आधार पडताळणी तात्काळ करा- मंत्री ॲड.शेलार यांचे निर्देश
 
सकाळच्या सत्रात “छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, महर्षी कर्वे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक प्रासंगिकता” या विषयावर व्याख्यान सत्र आयोजित करण्यात आले. ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक व विचारवंत मा. ज. वि. पवार यांनी सामाजिक समतेच्या दृष्टीने या महापुरुषांच्या विचारांचे महत्त्व स्पष्ट केले. प्रमुख व्याख्याते डॉ. पी. एस. कांबळे यांनी आधुनिक काळातील त्यांच्या विचारांची उपयुक्तता यावर मार्गदर्शन केले.(S.N.D.T. Women's University)
 
कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा नियंत्रक डॉ. संजय नेरकर, प्रा. वीरेंद्र नगराळे, वित्त व लेखाधिकारी विकास देसाई, उपकुलसचिव राकेश वळवी तसेच विविध अधिष्ठाता, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
 
दुपारच्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनाली राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. संजय शेडमाके यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.(S.N.D.T. Women's University)