Proposal to Narrow Road in Worli : वरळीतील रस्ता अरुंद करण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेचा (ठाकरे) विरोध

बहुमताच्या जोरावर प्रस्तावाला मंजुरी

    24-Apr-2026
Total Views |
ashwini bhide

मुंबई : (Proposal to Narrow Road in Worli) वरळीतील ससमीरा रस्त्याचे अरुंदीकरण करण्याच्या प्रस्तावावरून महानगरपालिकेत राजकीय वाद निर्माण झाला असून शिवसेनेने (ठाकरे) या निर्णयाला कडाडून विरोध दर्शविला आहे. स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षा यामिनी जाधव यांनी बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केल्याने शिवसेनेने प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे.
 
हा प्रस्ताव मोहन दामोदर पाटील मार्ग ते नारायण हर्डीकर मार्ग या दरम्यानच्या १८.३० मीटर रुंदीच्या मंजूर रस्तारेषेत बदल करण्यासंबंधी आहे. या बदलामुळे ससमीरा रस्त्याची रुंदी कमी होणार असून स्थानिक स्तरावर नाराजी व्यक्त होत आहे. एका बाजूला बाळासाहेब ठाकरे दवाखाना तर दुसऱ्या बाजूला सिंधी कॉलनी वसाहत असल्याने रस्ता अरुंद झाल्यास वाहतूक कोंडी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Proposal to Narrow Road in Worli)
 
शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका पद्मजा चेंबुरकर यांनी या प्रस्तावाला जोरदार विरोध करत स्थानिक परिस्थितीचा सविस्तर आढावा समितीसमोर मांडला. वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा विचार करता रस्ता रुंद करणे आवश्यक असताना प्रशासनाने उलट अरुंदीकरणाचा प्रस्ताव मांडल्याची टीका त्यांनी केली.(Proposal to Narrow Road in Worli)
 
 
दरम्यान, महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “मुंबईतील सार्वजनिक रस्ते विकण्याचा प्रकार सुरू असून हा प्रकार कदापी सहन केला जाणार नाही. प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करू,” असा इशारा त्यांनी दिला.
 
या संदर्भात महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना निवेदन देण्यात आले असून प्रस्ताव तातडीने रद्द करून पुन्हा पाहणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.(Proposal to Narrow Road in Worli)