Agripada Corporate Jihad Case : नाशिकनंतर मुंबईतच्या आग्रीपाड्यातही कॉर्पोरेट जिहाद!

१९ वर्षीय तरुणीचा छळ; आरोपी अशरफ पोलिसांच्या ताब्यात

    24-Apr-2026   
Total Views |
Agripada Corporate Jihad Case
 
मुंबई : (Agripada Corporate Jihad Case) महालक्ष्मी येथील पिरामल कन्स्ट्रक्शनमध्ये टेलीकॉलर म्हणून काम करणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणीला तिच्याच पूर्वीच्या सहकाऱ्याने व्हॉट्सअॅपवर अश्लील संदेश, अश्लील फोटो-व्हिडिओ पाठवत लैंगिक संबंधांसाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून गुरुवारी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात संबंधित आरोपी अशरफविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.(Agripada Corporate Jihad Case)
 
मिळालेल्या एफआयआर कॉपीनुसार, पीडित काही दिवसांपूर्वी महालक्ष्मी येथील पिरामल कन्स्ट्रक्शनमध्ये टेलीकॉलर म्हणून नोकरीला रुजू झाली होती. त्या ठिकाणी मुलं-मुली एकत्र काम करत होते. मात्र, साईट बंद झाल्यामुळे अवघ्या १५ दिवसांत तिने ती नोकरी सोडली होती. दि. २१ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ११.१५ वाजता पीडिता घरी असताना तिच्या व्हॉट्सअॅपवर एका अनोळखी क्रमांकावरून संदेश आला. त्यानंतर त्याच क्रमांकावरून व्हॉईस मिस्ड कॉलही आला. पीडितेने 'कोण?' असा संदेश पाठवल्यानंतर समोरून 'अशरफ हूँ, पिरामल वाला' असा प्रतिसाद आला. त्यानंतर तिला कंपनीतील सहकारी अशरफ असल्याचे लक्षात आले.(Agripada Corporate Jihad Case)
 
अशरफने कंपनीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधून तिचा मोबाईल नंबर मिळवल्याचेही सांगितले. काही वेळातच त्याने व्हॉट्सअॅपवर व्हॉईस कॉल करून अश्लील आणि आक्षेपार्ह भाषेत बोलण्यास सुरुवात केली. पीडितेच्या म्हणण्यानुसार, आरोपी अशरफने तिला 'लव्ह फ्रेंडशिप' करण्याचा आग्रह धरला तसेच लॉजवर जाऊन शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा देखील व्यक्त केली. पीडितेने नकार दिल्यानंतरही त्याने विविध अश्लील गोष्टी बोलत तिच्यावर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला. जवळपास एक तास आरोपी तिच्याशी अशा स्वरूपात बोलत होता. या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने तात्काळ आपल्या वडिलांना सर्व प्रकार सांगितला.(Agripada Corporate Jihad Case)
 
दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ एप्रिल रोजीही आरोपी वारंवार फोन आणि मेसेजेस पाठवत होता. यामध्ये त्याने काही मुलींचे फोटो पाठवून त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा केला. त्यानंतर काही अश्लील व्हिडिओही पाठवण्यास सुरुवात केली. हे सर्व पाहून आपल्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न झाल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. ती सातत्याने नकार देत असतानाही आरोपी त्रास देत राहिला. दरम्यान, आरोपीने पिरामल साईटवरील पीडितेची मैत्रीण खुशीसोबतही शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा केला. त्यावेळी पीडितेने प्रिया आणि खुशी या मैत्रिणींशी संपर्क साधून याबाबत चौकशी केली असता, अशरफने त्यांनाही अशाच प्रकारचे फोन आणि संदेश पाठवल्याचे त्यांनी सांगितले.(Agripada Corporate Jihad Case)
 
या संपूर्ण प्रकारामुळे घाबरलेल्या पीडितेने आग्रीपाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ अन्वये कलम ७५, ७८(२), ७९ त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० अन्वये कलम ६७(अ) अंतर्गत गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. आरोपी समाजवादी पक्षाच्या एका नगरसेविकेचा भाचा असल्याचा आरोप भाजपाचे पदाधिकारी नितीन बनकर यांनी केलाय. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.(Agripada Corporate Jihad Case)
 
जिहादी मानसिकतेचा पर्दाफाश करण्याकरता हिंदुत्ववादी कार्यकर्ते सदैव तत्पर आहेत. अशा जिहाद्यांविरोधात पोलिसांनीसुद्धा तक्रार नोंदवताना कठोर कलमं लावणे आवश्यक आहे. राज्यात घडणाऱ्या अशा प्रकरणांच्या चौकशीसाठी सरकारने एआयटी स्थापन करायला हवी, तरच अशा जिहादी मानसिकतेच्या लोकांमध्ये भिती निर्माण होईल. मुंबईच्या प्रकरणातील मुलगी धीट असल्याने तीने त्वरीत अन्यायाविरुद्धा आवाज उठवला, त्यामुळे संपूर्ण प्रकार समाजासमोर आला. अन्यथा प्रकरण कुठेतरी दाबलं गेलं असतं.(Agripada Corporate Jihad Case)
 
- रवींद्र दाभोळकर, सकल हिंदू समाज
 
नाशिकसह राज्यातील विविध शहरांत घडणाऱ्या अशा घटना केवळ स्वतंत्र गुन्हे म्हणून पाहून चालणार नाहीत. नावं बदलतात, शहरं बदलतात; पण महिलांना लक्ष्य करणारी, त्यांना मानसिक, सामाजिक आणि व्यावसायिक पातळीवर तोडण्याचा प्रयत्न करणारी प्रवृत्ती मात्र तशीच राहते. आज शिकणारी, स्वतःच्या पायावर उभी राहणारी तरुणी केवळ बाहेरच्या असुरक्षिततेशी नाही, तर कार्यालयातील सत्ताधारी मानसिकता, तक्रार दाबणारी यंत्रणा आणि पीडितेलाच दोष देणाऱ्या समाजाशीही लढत आहे. आज गरज फक्त जागृतीची नाही, तर जबाबदारी स्वीकारण्याची आहे. हा विध्वंसक वणवा विझवायचा की त्यात होरपळायचं, हे आता महाराष्ट्राने ठरवायचं आहे.(Agripada Corporate Jihad Case)
 
- प्रिया सावंत, कोकण प्रांत उपाध्यक्षा, विश्व हिंदू परिषद
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक