Nitesh Rane : महाराष्ट्र जहाजबांधणी क्षेत्रात देशात आघाडी घेणार, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणेंनी व्यक्त केला विश्वास

आर्थिक शिखर परिषदेत मंत्री नितेश राणे यांचे विधान

Total Views |
Nitesh Rane

मुंबई : (Nitesh Rane) राज्य सागरी क्षेत्रात मोठी झेप घेण्याच्या तयारीत असून जहाजबांधणी, बंदरांचे आधुनिकीकरण आणि किनारी पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून आर्थिक विकास आणि रोजगारनिर्मितीला चालना दिली जात असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र स्वतःला देशातील एक प्रमुख सागरी केंद्र म्हणून विकसित करत आहे. यासाठी धोरणात्मक सुधारणा, गुंतवणूकदारांशी संवाद आणि मोठ्या प्रमाणावर पायाभूत प्रकल्प राबवले जात आहेत, असेही ते यावेळी म्हणाले.(Nitesh Rane)
 
आर्थिक शिखर परिषदेत संबोधित करताना ते बोलत होते. मंत्री राणे यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या सागरी दृष्टीकोनाशी सुसंगत राहण्यासाठी राज्याने जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि जहाज तोडणीसाठी स्वतंत्र धोरण आणले आहे. सरकार स्थापनेच्या पहिल्या १०० दिवसांतच हे धोरण लागू करण्यात आले असून गुंतवणूकदारांना स्पष्टता आणि विश्वास देणे हा त्यामागील उद्देश आहे. वाढवण बंदर प्रकल्पाचा विशेष उल्लेख करत राणेंनी सांगितले की, हा प्रकल्प महाराष्ट्राला जागतिक स्तरावरील प्रमुख बंदरांमध्ये स्थान मिळवून देऊ शकतो. खोल पाण्याची क्षमता आणि मोठ्या प्रमाणातील हाताळणीमुळे हा प्रकल्प औद्योगिक विकास, निर्यात आणि रोजगारासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.(Nitesh Rane)
 
हेही वाचा : Maharashtra Motor Vehicle Rules 1989 : मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचे निर्णायक पाऊल
 
राज्य सरकार जहाज बांधणी कारखाने, दुरुस्ती केंद्रे आणि संबंधित उद्योग उभारण्यावर भर देत आहे. भारतातील सर्वात मोठ्या शिपयार्डपैकी एक उभारण्याचे नियोजन सुरू असून त्यासाठी जमीन आणि धोरणात्मक मदत दिली जात आहे. नेदरलँड्स, स्वीडन आणि फिनलंड यांसारख्या देशांसोबत तांत्रिक सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे राणे यांनी सांगितले. बंदरे, जहाजबांधणी, लॉजिस्टिक्स आणि जलवाहतूक यांना एकत्रित करून महाराष्ट्र एक मजबूत सागरी अर्थव्यवस्था उभी करत आहे. धोरणात्मक स्पष्टता, पायाभूत गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांच्या मदतीने राज्य देशाच्या पुढील आर्थिक वाढीत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.(Nitesh Rane)
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.