Legislative Council Election : महाविकास आघाडीत विधानपरिषदेवरून अंतर्गत संघर्ष - नवनाथ बन

विधान परिषदेच्या काळात उद्धव ठाकरेंनी एकतर ठोस मुद्दा मांडला का? असा बन यांचा सवाल

    24-Apr-2026
Total Views |
navnath ban
 
मुंबई : (Legislative Council Election) "महाविकास आघाडीत सध्या विधानपरिषद निवडणुकीवरून तीव्र अंतर्गत संघर्ष सुरू झाला आहे. काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेत, उबाठा गटाला कडक अट घातली आहे की जर विधानपरिषदेत संधी हवी असेल तर आगामी राज्यसभेची जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय आत्ताच घ्यावा लागेल. हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर जाऊन ही भूमिका ठणकावून सांगितल्यामुळे आघाडीतील तणाव अधिकच वाढला आहे. काँग्रेसचा सवाल स्पष्ट आहे. “आम्ही फक्त पाठिंबा द्यायचा का, संधी कधी मिळणार?” यामुळे महाविकास आघाडीत समन्वयाऐवजी स्पर्धा आणि अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे." असे स्पष्ट मत भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवार दि.२४ रोजी व्यक्त केले.(Legislative Council Election)
 
"उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषद कार्यकाळात त्यांनी एकतरी ठोस मुद्दा सभागृहात मांडला का? मुख्यमंत्री असताना आणि आमदार असताना त्यांनी जनतेचे प्रश्न मांडले का, याचे उत्तर द्यावे."असेही बन म्हणाले.
 
"उबाठा गटात आता उघडपणे दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे. एकीकडे उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेत पाठवण्याची चर्चा आहे, तर दुसरीकडे संजय राऊत स्वतःच्या राज्यसभेच्या भवितव्याबाबत चिंतित आहेत. जर उद्धव ठाकरे विधानपरिषदेत गेले, तर पुढील राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दावा मजबूत होईल आणि राऊत यांची जागा धोक्यात येऊ शकते. त्यामुळेच राऊत उद्धव ठाकरेंचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.संजय राऊत यांच्याकडे आता दोन पर्याय उरल्याची चर्चा आहे. पहिला म्हणजे उबाठा गटात राहून उद्धव ठाकरेंचा मार्ग अडवून स्वतःची राज्यसभा टिकवणे. आणि दुसरा म्हणजे काँग्रेसशी जवळीक वाढवून भविष्यात त्या पक्षाच्या कोट्यातून राज्यसभा मिळवण्याचा प्रयत्न."असेही बन यांनी उबाठा मधील अंतर्गत संघर्षावर भाष्य केले.(Legislative Council Election)
 
"नारीशक्ती वंदन विधेयकावर विरोध करणाऱ्यानी “देशात महिला पंतप्रधान का नाही?” असा सवाल करणाऱ्यांनी आधी आपल्या पक्षात रश्मी ठाकरे यांना नेतृत्वाची संधी दिली का ? २०१९ मध्ये सत्ता असताना किंवा आजही पक्षात महिलांना नेतृत्व देण्याची तयारी आहे का, यावर उबाठा गट मौन बाळगत आहे." असेही बन यांनी सुनावले.(Legislative Council Election)
"पाटकर ताईंना पुस्तक प्रकाशित करू नये म्हणून धमक्या दिल्या जात आहेत. एका बाजूला महिला सन्मानाच्या घोषणा आणि दुसऱ्या बाजूला महिलांना दडपण्याचे प्रयत्न, ही विरोधाभासी भूमिका आहे. राज्यात सरकार सक्षम असून कोणत्याही महिलेला त्रास होऊ दिला जाणार नाही." असेही बन यांनी स्पष्ट केले.
 
"महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची असावी, प्रत्येकाने मराठी शिकावी आणि वापरावी, ही भूमिका योग्य आहे. मात्र मराठीच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणे किंवा मारहाण करणे चुकीचे आहे.भाषा सन्मानाची असावी, भीतीची नव्हे." असा संदेश बन यांनी दिला.(Legislative Council Election)
 
"राज्यात काही ठिकाणी जबरदस्ती धर्मांतरणाचे प्रकार समोर येत आहेत, हे अत्यंत गंभीर आहे. अशा प्रकारांना प्रोत्साहन देणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असून, सरकार याबाबत सजग आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत."अशी माहिती बन यांनी दिली.(Legislative Council Election)