Legislative Council : महाविकास आघाडीचे विधानपरिषदेचे उद्धव ठाकरे उमेदवार?
24-Apr-2026
Total Views |
मुंबई: (Legislative Council) महाविकास आघाडीच्या वतीने विधान परिषदेच्या जागेसाठी सर्वानुमते उद्धव ठाकरे उमेदवार असणार का अशा चर्चांना ऊत आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या एक्स हँडलवरून गुरुवार दि.२३ रोजी याबाबत ट्विट केले आहे ज्यात त्या म्हणतात,"महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे. ही निवडणूक राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच लढावी अशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची आग्रहाची विनंती आहे. उद्धवजी हे राज्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राज्याला तसेच सभागृहाला सदैव फायदाच होत राहील, असा आम्हा सर्वांना विश्वास आहे. उद्धवजींनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा ही नम्र विनंती." (Legislative Council)
तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील गुरुवार दि.२३ रोजी उध्दव ठाकरेंची भेट घेतली होती. यावर बोलताना सपकाळ म्हणतात की, "आजच्या भेटीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर साधक बाधक चर्चा झाली, भविष्यातील जी आव्हाने आहेत त्या अनुषंगाने चर्चा झाली. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षात योग्य संवाद रहावा यासाठी ही भेट होती. या भेटीत विधान परिषद निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली नाही. काँग्रेस पक्षाची या संदर्भातील भूमिका स्पष्ट आहे, राज्यसभा निवडणूक काँग्रेसने लढवावी व उद्धव ठाकरे हे मविआचे चेहरा आहेत, त्यांनी विधान परिषद लढवावी." (Legislative Council)