दिवसागणिक उघडकीस येणारी ‘लव्ह जिहाद’ची, आता ‘कॉर्पोरेट जिहाद’ची प्रकरणे आपण बघतो, ऐकतो, वाचतो. त्याबद्दल मतप्रदर्शन करताना अगदी खेद, संताप, चीडही व्यक्त करतो. पण, त्यापुढे हिंदू मुलामुलींचे पालक म्हणून तुम्ही-आम्ही खरंच काही कृती करतो का? प्रसंगी मुलींना ‘सावध हरिणी सावध गं...’ असा काळजीपोटी इशारा देतो, थोडेसे दटावतो, दरडावतोही. पण, मुलींनी वर्तणुकीत बदल करावा म्हणून आपण स्वत:, कुटुंबातील अन्य सदस्य जीवनशैलीत खरंच काही बदल आत्मसात करतात का? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे मिळाली की आपसुकच लक्षात येते की, आपणही धार्मिकतेवर एकप्रकारे काळा बुरखा पांघरुन निद्रिस्त आहोत. म्हणूनच या ‘हिंदू हिजाब’पासून जागे होण्यासाठी पालकांना कळकळीचे आवाहन करणारा हा लेख...
अमरावतीत मोहम्मद अय्याज तन्वीर या १९ वर्षांच्या मुलाचं नाव सध्या देशभरात त्याच्या कारनाम्यांमुळे चर्चेत आहे. या तरुणाने तब्बल ३५० हून अधिक अश्लील व्हिडिओ क्लिप व्हायरल केल्या आणि जवळपास १८० हून जास्त अल्पवयीन हिंदू मुलींचं लैंगिक शोषण केले, हे विदारक सत्य चौकशीअंती समोर आले. या सर्व आरोपांवर वरचढ प्रकार असा की, याबाबत कोणतीही फिर्याद दाखल केलेली नाही. सर्व मुलींचे अर्धनग्न व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले, तरी कोणीही तक्रार दाखल करायला पुढे धजावले नाही. तरी, या विषयाची गंभीर दखल घेत अनिल बोंडे यांनी स्वतः हा मोहम्मद अय्याज तन्वीर याच्याविरोधात तक्रार दाखल केली आणि मग सर्व सूत्र फिरायला लागली, नाही तर, तोपर्यंत हा प्रकार कदाचित असाच सर्रास सुरू होता.
दुसरा उघडकीस आलेला तितकाच धक्कादायक प्रकार हा नाशिकच्या ‘टीसीएस’ कंपनीतला. तिथेही हिंदू मुलींचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरणाचा दबाव. कंपनीची एचआर हेड निदा खान, अश्विनी चेनानी हिने नाशिकमध्ये सुरू केलेल्या लैंगिक शोषणाचा हा प्रकार थेट मलेशियामध्ये या मुलींच्या देहविक्रीसंदर्भात जोडला जात आहे. किती भयाण आहे बघा!
या सर्व प्रकारांबद्दल गेल्या काही दिवसांत सर्व अंगाने चर्चाही झाली. मुस्लीम धर्म, त्यांची शिकवण, त्यांची कट्टरता यांविषयी आपण जागोजागी भाष्य करतो, ऐकतो. पण, मग खरोखरीच त्यांच्या या कृत्यासाठी सर्वस्वी तेच १०० टक्के जबाबदार आहेत? आपण हिंदू म्हणून कुठेतरी चुकत आहोत; कमी पडलो आहोत, ही जाणीव आपल्याला नेमकी केव्हा होणार? हिंदू म्हणून माझीही काहीतरी जबाबदारी आहे, याची जाणीव होण्यासाठी आणखीन किती वेळ लागणार? त्यातच ‘हे सगळं भाजप सत्तेत आल्यापासून जास्त सुरू झालंय; नाही तर आधी असं होत न्हवतं,’ असं मानणारे बरेच बुद्धिजीवी मी ठिकठिकाणी पाहिले आहेत. पण, खरोखरीच आपलं काहीच चुकलं नाही का? हिंदू मुली इतया नादान आणि बावळट आहेत का, की कोणीही त्यांना फसवेल आणि आपण त्यांच्या जाळ्यात अडकू? यांसारख्या बर्याच बाबींचा गांभीर्याने विचार हा व्हायलाच हवा. आणि या सगळ्याचं पहिले प्रमुख कारण म्हणजे, घरातील मुलामुलींचा पालकांशी तुटलेला संवाद. दुसरे कारण : व्यक्ती-कुटुंब-समाज (राष्ट्र) या तिन्ही घटकांचा सुसंवाद न झाल्याने हा विकृत प्रकार घडत आहे आणि यातूनच काही प्रश्नांची उत्तरं आपणही आपल्याला स्वतःला विचारायला हवी. खरंच आपण या प्रश्नांची स्वतःला उत्तरं विचारून बघू.
१) मी स्वतः हिंदू असल्याचा अभिमान बाळगतो का? २) माझं कुटुंब हिंदू आहे, म्हणूनही मी अभिमान बाळगतो का? ३) मी स्वतः किती वेळा आपल्या जवळपासच्या देवळात जातो? (दररोज/आठवड्यातून एकदा/महिन्यातून एकदा/कधीच नाही.) ४) कारण, आपल्याला असंही शिकवलं जातं की, देव केवळ देवळात नाही, बरोबर ना? ५) हिंदू म्हणून आपण किती वेळा आपल्या देवाची मनोभावे पूजा करतो आणि त्यासंदर्भातील भजन-कीर्तन-आरती करतो? ६) माझ्यासोबत घरातील लहान-थोरांना सर्वांना देवळात जायची सवय आहे? ७) या सर्व धर्मकार्यासाठी घरात देव्हारा आहे का आणि देव्हार्यात हिंदू देवीदेवता आहेत का? ८) नित्यनियमाने घरातील प्रत्येकजण मनोभावे देवाची आरती आणि पूजा करतो का? ९) दिवसातून एकदा आपण सहकुटुंब, सामूहिक जेवण करतो का? जेवताना टीव्ही-मोबाईल न वापरता, एकत्र एकमेकांशी गप्पा मारत जेवतो का? १०) दिवसातील किमान अर्धा तास सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक कार्यात हातभार म्हणून काम करतो का? ११) बाकी सोडा, घरात आपल्या मुलांना आपल्या धर्माचं आचरण करण्यासाठी किमान अर्धा तास सोबत बसून प्रवृत्त करतो का? १२) त्यांच्यासोबत बसून धर्माचरण करतो का? १३) आमच्या वेळी आम्हाला योग्य शिक्षण मिळालं नाही, म्हणून आता माझ्या मुलांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळू देण्यासाठी, मी अहोरात्र प्रयत्न करतो. पण, माझ्यावर जसे हिंदू धर्माचे संस्कार झाले, तसे त्याच्यावरही व्हायला हवे, म्हणून मी दररोज काय प्रयत्न करतो? १४) माझंही एक व्यक्तिगत आयुष्य आहे, एक कुटुंब आहे आणि ही कुटुंबव्यवस्था टिकविण्याची जबाबदारी मी व्यवस्थित पार पाडतोय का? १५) पुढच्या पिढीस शिक्षणासोबत धर्म-संस्कार शिकविण्याची जबाबदारी मी व्यवस्थित निभावतो आहे का? १६) आंतरधर्मीय विवाह केला, तरी चालेल, असं म्हणत मुलांना स्वैर जगण्याचे धडे मीच गिरवायला शिकवतो का? १७) मी पाश्चात्य विचार आणि आचारसरणी घरात राबवितो. मग माझा मुलगा-मुलगी माझंचं अनुकरण करणार नाही का? १८) माझ्या वडिलांना मराठी लिहिता-वाचता आणि बोलता येत होतं. मला थोडं-फार लिहिता-वाचता आणि बोलता येते का? १९) माझ्या मुलाला नुसती भाषा बोलता येते आणि त्याच्या मुलाला शून्य. नातवाला ‘शून्य’ कळणार नाही, ‘झिरो’ कळेल! २०) हा आपला आलेख बरोबर आहे की चूक, याचे उत्तर तुम्ही तुमच्या मनाला देत आहात का? २१) त्यातल्या त्यात मुलींसाठी अजून काही सवलती. २२) आईपेक्षा वडिलांचा मुलीवर अधिक जीव असतो. मग जे पाहिजे ते लगेच हजर केलं जातं. हे खरं की खोटं? २३) वंशाला दिवा हवा, म्हणून स्त्रीभ्रूणहत्या सर्रास होत होत्या का? २४) मग त्याचमुळे सध्या स्त्रियांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी झाली आहे. २५) मग काय, आता मुलींच्या मागण्या वाढल्या, मुलांकडून त्यांच्या अपेक्षाही वाढल्या. २६) मुलाचा पगार माझ्या पगारापेक्षा जास्त किंवा माझ्याएवढा हवाच, असाही आजकालच्या मुलींचा आग्रह. २७) घरात कमीत कमी ‘डस्ट बिन’ (सासू-सासरे) हवेत; म्हणजेच न कमावणार्या व्यक्ती घरात नकोत, असंही मानणारा मुलींचा एक वर्ग आज समाजात दिसतो. २८) घरात काही बनवलं नाही, तर त्या पतीने स्वतः बनवून खायला घालावे, अन्यथा बाहेरून मागवून खायला घालावे, असा विचार करणार्या मुलींमुळेही कौटुंबिक स्वास्थ्य आज धोक्यात आले आहे. २९) माझ्या म्हणण्याप्रमाणे वागणाराच पती हवा. त्याने माझे व्यक्तिस्वातंत्र्य अडचणीत आणू नये, ही काही मुलींची विचारसरणीही संसारात अडसर ठरणारी. ३०) माझ्या व्यक्तिगत नातेसंबंधांत, पाश्चात्य राहणीमानात अडीअडचणी आणू नये वगैरे वगैरे विचार... ३१) आता असे विचारच जर काही हिंदू मुली करणार असतील, तर आपण कोणत्या तोंडाने इस्लामीकरण थांबवू शकू? ३२) हातात बांगड्या, कपाळावर कुंकू, पायात जोडवी, अंगभर सुंदर साडी, केसात सुंदर मोगर्याचा गजरा हे सगळं इतिहासजमा झालंय, असं असताना अपेक्षा का? ३३) मुघलांनी ७०० वर्षे आमच्यावर राज्य केलं. इंग्रजांनी १५० वर्षे राज्य केलं आणि आमच्या आई-वडिलांचं ‘मम्मी-पप्पा’ असं नामकरण झालं. काय गमावलं आपण? ३४) विचार करा, आचार-विचार आम्ही दोन्ही गमावले. ३५) आणि वरुन काय तर म्हणे, तर ही सरकारची जबाबदारी आहे! ३६) आपला धर्म टिकवणं, ही एकटी सरकारची जबाबदारी कशी? ३७) आपल्या रुढी-परंपरा आपणच जपायला हव्यात, असं म्हणत, विचार न करता रूढी-परंपरा बंद कुणी केल्या? ३८) आपणच आपल्या मुलींना आपला धर्म पाळायला शिकविला पाहिजे; नाही तर त्या इतर धर्मीयांना आपलेसे करण्यास स्वतःहून तयार होतील; हे आपण पाहातच आहोत. ३९) या फसवलेल्या मुलींची ‘मॉक टेस्ट’ घ्यायला हवी. त्यांच्या विचारांतील कमतरता अभ्यासायला हवी; तेव्हा आपल्या चुका आपल्यासमोर येतील. ४०) त्यांना घरातून बाहेर जाताना घरातल्यांनी कोणी त्यांना ‘कुठे जाताय,’ असं विचारलं नाही का? आणि त्या मोकळ्या मनाने पालकांना आपण कुठे जात आहोत, हे का सांगू शकल्या नाहीत? ४१) त्या इतका वेळ बाहेर राहिल्या, तेव्हा घरातले काय करत होते? ४२) आपला अश्लील व्हिडिओ काढला जात आहे, हे माहीत असतानाही त्या बिनधास्त कशा जगत होत्या?
या सर्व गंभीर प्रश्नांची उत्तरे शोधताना मला हिंदू धर्मासाठी शब्दकोशात नवीन शब्द अंतर्भूत करावासा वाटतो. तो म्हणजे, ‘हिंदू हिजाब!’ सगळ्या गोष्टी अगदी लख्खपणे आपल्याला समोर दिसत आहेत. समाजरचना बिघडत आहे. हिंदू मुली वाईट आचरण करत आहेत. तरी आम्ही आमच्या धार्मिकतेवर हा काळा बुरखा घालून निशब्द बसून आहोत. लाज-शरम सगळी मातीमोल झाली आहे. हे सगळं बघून धर्मवीर संभाजी महाराजांचं धर्मासाठीच बलिदान व्यर्थ गेलं का, असाही प्रश्न खेदाने उपस्थित करावासा वाटतो. गुरु गोविंद सिंग, महाराणा प्रताप आणि बरेच, यांचं बलिदान व्यर्थ गेलं का? हिंदू धर्म टिकून राहावा, म्हणून ‘जोहार’ करणार्या सर्व वीरांगनांचं बलिदान एकीकडे आणि ‘हिंदू हिजाब’ दुसरीकडे! भारतमातेच्या अजून किती हिंदू मुलींची अब्रू अशी वेशीवर टांगलेली पाहायची बाकी आहे? आता तरी जागे व्हा!
अॅड. संजय रुळे
९८६७९४८९५०/८८५०४५५२०७