deepak singh yuva morcha president : महिला आरक्षणाच्या समर्थनार्थ युवतींचा व्यापक आक्रोश आंदोलन

    24-Apr-2026
Total Views |
 
deepak singh
 
मुंबई : (deepak singh yuva morcha president) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आणलेल्या ऐतिहासिक ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’च्या अंमलबजावणीमध्ये विरोधकांकडून टाकल्या जाणाऱ्या अडथळ्यांच्या आणि क्षुद्र राजकारणाच्या निषेधार्थ गुरुवार दि.२३ रोजी मुंबईतील रस्त्यांवर युवतींनी मोठ्या प्रमाणावर आक्रोश आंदोलन केले.
 
भाजयुमो मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यावेळी म्हणाले की,“नारी शक्ती वंदन अधिनियम हा केवळ एक कायदा नसून, अनेक वर्षांपासून वंचित राहिलेल्या देशातील अर्ध्या लोकसंख्येला त्यांचा हक्क देणारा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय आहे. हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ठाम इच्छाशक्तीचा परिणाम आहे. या कायद्याला रद्द करण्याचा किंवा कमकुवत करण्याचा कोणताही प्रयत्न हा देशातील मातृशक्तीवर अन्याय ठरेल.” (deepak singh yuva morcha president)
 
हेही वाचा :  Navnath Ban : मोर्चाच्या आक्रोशामुळे विरोधकांच्या कानठळ्या बसल्या आहेत - नवनाथ बन
 
भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष दिपक सिंह यांच्या नेतृत्वात आयोजित या आंदोलनात मुंबईतील सहा जिल्ह्यांतील प्रमुख महाविद्यालयांबाहेर मोठ्या संख्येने विद्यार्थिनी व युवती सहभागी झाल्या. (deepak singh yuva morcha president)
 
युवा महिलांनी स्पष्टपणे सांगितले की, हा अधिनियम त्यांच्या राजकीय भविष्यासाठी, प्रतिनिधित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जर कोणत्याही राजकीय हेतूने हा कायदा रोखण्याचा किंवा कमकुवत करण्याचा प्रयत्न झाला, तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.
 
ठाकूर कॉलेज – उत्तर मुंबई,
विवेक कॉलेज, गोरेगाव – उत्तर पश्चिम मुंबई,
आर.डी. नॅशनल कॉलेज, वांद्रे पश्चिम – उत्तर मध्य मुंबई,
अस्मिता कॉलेज, विक्रोळी – उत्तर पूर्व मुंबई,
विद्यालंकार कॉलेज, वडाळा – दक्षिण मध्य मुंबई,
भारतीय विद्या भवन, चर्नी रोड – दक्षिण मुंबई.
 
या सर्व ठिकाणी युवती व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत जोरदारपणे आंदोलन करत आपला आवाज बुलंद केला. (deepak singh yuva morcha president)