Savitribai Phule Pune Vidyapeeth : प्राध्यापक पदासाठी 'सेट' परीक्षा 'जुलै'च्या पहिल्या आठवड्यात; विद्यार्थ्यांनो लागा तयारीला
23-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Savitribai Phule Pune Vidyapeeth) "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी परीक्षा आयोजित केले जाते. यावर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा आयोजित करण्याचा आमचा प्रयत्न आहे."असे प्रतिपादन कुलगुरू डॉ सुरेश गोसावी यांनी केले.
महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी सहाय्यक प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी घेतली जाणारी सेट परीक्षा येत्या जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाचे नियोजन आहे. त्यादृष्टीने आवश्यक बैठका व नियोजन केले जात असल्याची माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांनी दिली. त्यामुळे परीक्षेच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता तयारीला लागायला हवे.(Savitribai Phule Pune Vidyapeeth)
नॅशनल टेस्टिंग एजन्सी नेट परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतले जाते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी सेट परीक्षा वर्षातून दोन वेळा घ्यावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. मागील वर्षी जून २०२५ मध्ये सेट परीक्षा घेतली गेली. त्यामुळे येत्या जून महिन्यात परीक्षा होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून सेट विभागासाठी समन्वयक उपलब्ध नव्हते.
आता विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांच्याकडे हा पदभार देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील दोन अडीच महिन्यात सेट परीक्षेचे नियोजन करून परीक्षा घेतली जाईल, अशी अपेक्षा आहे.(Savitribai Phule Pune Vidyapeeth)