मुंबई : (Murshidabad Bomb Attack) पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान मुर्शिदाबाद जिल्ह्यात हिंसेचा प्रकार घडल्याचे निदर्शनास आले. जिल्ह्यातील नौदा भागात अज्ञात हल्लेखोरांनी देशी बॉम्ब फेकल्याने परिसरात गोंधळ उडाला. यात अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान झालेली ही हिंसेची पहिली मोठी घटना असून त्यानंतर निवडणूक आयोग आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.
अहवालानुसार, हल्लेखोरांनी अचानक जमावाला लक्ष्य करत बॉम्बफेक केली, ज्यामुळे मतदान केंद्राजवळ उपस्थित असलेले नागरिक त्याच्या विळख्यात सापडले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलांची तैनाती करण्यात आली. सध्या हल्लेखोरांची ओळख आणि या घटनेमागील कारणांची सविस्तर माहिती येणे बाकी आहे, मात्र या हल्ल्यामुळे निवडणुकीतील शांततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. (Murshidabad Bomb Attack)
पश्चिम बंगालमधील १५२ विधानसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झाले. १६ जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या भागांत सुमारे ३.६ कोटी मतदार १,४५२ उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय घेताना दिसले. शांततेत मतदान पार पडावे यासाठी निवडणूक आयोगाने अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था केली होती. मात्र याचदरम्यान मालदा आणि मुर्शिदाबाद येथून किरकोळ हिंसाचार आणि गोंधळाच्या घटनाही समोर आल्या. (Murshidabad Bomb Attack)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक