Baramati Election Election : लोकशाही बळकटीसाठी जास्तीत जास्त मतदान हक्क बजावावा - सुनेत्रा पवार
सुनेत्रा पवार यांचे नागरिकांना आवाहन
23-Apr-2026
Total Views |
मुंबई : (Baramati Election) "लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी आपला मतदानाचा मूलभूत हक्क बजावावा."असे आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केले.बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री आणि बारामती पोटनिवडणुकीच्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत गुरुवार दि. २३ रोजी मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्या बोलत होत्या.
मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी सुनेत्रा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथे अजितदादांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले आणि आदरांजली वाहिली.यावेळी त्यांच्यासोबत खासदार पार्थ पवार उपस्थित होते.(Baramati Election)
खासदार शरद पवार यांना ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळे खासदार शरद पवार यांचे मतदान मात्र यावेळी प्रकृती स्वास्थ्याच्या कारणाने हुकले. सुनेत्रा पवार यांच्या सांगता सभेला देखील शरद पवार उपस्थित राहू शकले नव्हते.
"२०२९ साली मी निवडणूक लढवावी अशी जनतेची मागणी आहे. पण मला वाटतं की मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणून काम करावे." असे मत जय पवार यांनी व्यक्त केले.(Baramati ElectionElection)
यापूर्वी काँग्रेसने सुद्धा २०२९ साली बारामतीची निवडणूक (Baramti Election)लढवणार अशी घोषणा केली आहे.तर २०२९ साली सर्वपक्षीय लढाई होऊ शकते असे रोहित पवार यांनी म्हटले आहे."प्रत्येकाला या लोकशाहीत निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे." असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.(Baramati ElectionElection)