Riteish Deshmukh : रितेश देशमुख यांची 'सदिच्छा राजदूत' म्हणून नियुक्ती

    22-Apr-2026
Total Views |
Riteish Deshmukh
 
मुंबई : (Riteish Deshmukh) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. २२ रोजी मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कार्याची व्यापक प्रसिद्धी आणि रस्ता सुरक्षा अभियानाच्या जनजागृतीसाठी अभिनेते रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यांची 'सदिच्छा राजदूत' म्हणून नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अभिनेते रितेश देशमुख यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.(Riteish Deshmukh)
 
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ,महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे उपस्थित होते.